सुनबाई जपतेय सासूबाईंच्या व्यवसायाचा वारसा, सावंतवाडीतील ही खानावळ चवीमुळे सर्वत्र प्रसिद्ध

Last Updated:

famous mess in sawantwadi - 1985 साली मंगला देवस्थळी यांनी साधले मेस ही खानावळ सुरू केली. त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या सुनबाई गायत्री देवस्थळी यांनी ही खानावळ अविरत सुरू ठेवली आहे. येथील घरगुती जेवणाला पर्यटकांची मोठी मागणी आहे.

+
News18

News18

सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन व खाद्य संस्कृतीची खाण लाभली आहे. जिल्ह्यातील हीच खाद्य संस्कृतीची परंपरा सावंतवाडी शहरातील साधले मेस (खानावळ) यांनी जपली आहे. शुद्ध शाहाकारी जेवणासाठी ही खानावळ प्रसिद्ध आहे. गेली 39 वर्षांपासून ते सेवा देत आहेत. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
1985 साली मंगला देवस्थळी यांनी साधले मेस ही खानावळ सुरू केली. त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या सुनबाई गायत्री देवस्थळी यांनी ही खानावळ अविरत सुरू ठेवली आहे. येथील घरगुती जेवणाला पर्यटकांची मोठी मागणी आहे. येथे जेवणासाठी खास नंबर लावावे लागतात. येथे जेवणासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.
advertisement
शुद्ध शाकाहारी जेवण असल्याने लोकांची याला मोठी पसंती आहे. दररोज 150 ते 200 जेवणाच्या थाळ्या येथे विकल्या जातात. सावंतवाडी शहरातील सर्वात जुनी खानावळ म्हणून ही प्रसिद्ध आहे. सासूबाईनी सुरू केलेली खानावळ गायत्री देवस्थळी या चालवत असून आजही सासूबाईची परंपरा जपत चालवत आहेत.
advertisement
दुपारी जेवणासाठी येणाऱ्यांना लोकांची नावाप्रमाणे नोंदणी करून जेवण दिले जाते. शिस्तबद्ध पद्धतीने सर्वाना पोटभर जेवण दिले जाते. वरण भात, पोळी, आंबोली, घावन चाटणी, पुरण पोळी, गुलाब जाम आणि सोलकढी असे पदार्थ येथील शुद्ध शाकाहारी थाळीत देतात. तसेच या थाळीची किंमत 100 रुपये आहे. साधले मेसमध्ये शुद्ध शाहाकारी नाश्ता, जेवण ही एक खवंय्यासाठी एक पर्वणी असते. त्यामुळेच इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सावंतवाडीमधील राजवाड्यानजिक, सबनीसवाडा याठिकाणी ही मेस आहे. तुम्हालाही येथील चव चाखायची असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकता. 
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
सुनबाई जपतेय सासूबाईंच्या व्यवसायाचा वारसा, सावंतवाडीतील ही खानावळ चवीमुळे सर्वत्र प्रसिद्ध
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement