Mumbai : खायला लाजायचं नाही! मुंबईकर 15 दिवस फुकटात जेवण, 125 कोटींच्या ऑर्डर, कारण...
Last Updated:
Mumbai Elections : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केटर्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. कार्यकर्त्यांसाठी नाश्ता, जेवण, चहा बिस्किटाची सेवा सुरू आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे शहरातील केटर्सची मागणी जोरात वाढली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या नाश्ता, जेवण आणि चहा बिस्किटांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स येत आहेत. हे काम साधारण पंधरा दिवसांसाठी सुरू असते आणि प्रत्येक दिवशी एका उमेदवाराने सरासरी 60 ते 70 हजार रुपये खर्च केले आहेत.
केटरर्सना 15 दिवसांसाठी बक्कळ कमाईची संधी
सकाळी नाश्ता निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात दिला जातो. त्यानंतर कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात जातात. दुपारी प्रचार संपल्यावर दुपारचे जेवणही केंद्र कार्यालयात उपलब्ध करून दिले जाते. प्रचाराच्या ठिकाणी सायंकाळी चहा आणि बिस्किटही दिले जातात तर रात्री प्रचार संपल्यावर संपूर्ण जेवण दिले जाते.
साधारण 100 ते 150 कार्यकर्ते सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतात. याशिवाय मोठ्या सभांमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि लोकसंख्येसाठी अतिरिक्त जेवणाची व्यवस्था केली जाते. आधी वडापाव मग नाश्त्याने काम चालत असले आता कार्यकर्त्यांना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण तसेच बंद बाटलीतील पाणी देणे अनिवार्य झाले आहे.
advertisement
उमेदवार प्रचार मोहिमेसाठी केटर्सची नेमणूक करीत आहेत आणि हा व्यवसाय निवडणुकीच्या काळात केटर्ससाठी फायदेशीर ठरतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 10:18 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : खायला लाजायचं नाही! मुंबईकर 15 दिवस फुकटात जेवण, 125 कोटींच्या ऑर्डर, कारण...










