ठाण्यात याठिकाणी मिळतो स्पॅनिश चूरोस अन् वॉफल, रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा, हे आहे लोकेशन
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
मुंबईमध्ये चुरोस हा पदार्थ फक्त दोन ते तीन ठिकाणी मिळतो. ठाणेकरांना मात्र हा चुरोस खायचा असेल, तर मुंबईला जावे लागायचे. हाच विचार करून गौरव रघुवंशी यांनी ठाण्यातच एक स्पॅनिश रेस्टॉरंट सुरू केले.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यात खवय्यांसाठी अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या व्हरायटीज असणारे पदार्थ हमखास मिळतात. ठाणे हे खवय्यांचे आवडीचे ठिकाण आहे. याच ठाण्यात स्पेन या देशात मिळणारे डेझर्ट एका रेस्टॉरंटमध्ये मिळते. ठाणे स्टेशनपासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या द बॉम्बे चुरोस या रेस्टॉरंटमध्ये स्पेन या देशातील प्रसिद्ध डेझर्ट म्हणजेच चुरोस हा पदार्थ मिळतो.
advertisement
मुंबईमध्ये चुरोस हा पदार्थ फक्त दोन ते तीन ठिकाणी मिळतो. ठाणेकरांना मात्र हा चुरोस खायचा असेल, तर मुंबईला जावे लागायचे. हाच विचार करून गौरव रघुवंशी यांनी ठाण्यातच द बॉम्बे चुरोस नावाने एक स्पॅनिश रेस्टॉरंट सुरू केले. आता ठाण्यातच तुम्हाला 10 हून अधिक प्रकारचे चुरोस, कोल्ड कॉफी आणि वॉफल मिळतील. यांची किंमत सुद्धा फक्त 100 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
ठाण्यामध्ये हे एकच असे स्पॅनिश रेस्टॉरंट आहे, जिथे व्हरायटीजमध्ये कोल्ड कॉफी आणि चूरोस मिळतात. ज्यांना गोड पदार्थ खायला अधिक आवडतात, त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच आहे. या स्पॅनिश रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला चुरोसमध्ये डार्क चॉकलेट चुरोस, व्हाईट फॅन्टसी चुरोस, मिल्क चॉकलेट चुरोस, कॅरमल स्ट्रॉबेरी चुरोस असे दहाहून अधिक प्रकार मिळतील.
ladki bahin yojana : साताऱ्यात 2 दिवस आधीच लाभार्थींच्या खात्यांवर पैसे जमा होण्यास सुरुवात, महिलांनी दिली ही प्रतिक्रिया
इथे मिळणारा कॅरेमल क्रंच चुरोस हा प्रकार सुद्धा खूप युनिक आहे. यात तुम्हाला आईस्क्रीम सुद्धा मिळेल. तुम्हाला जर काही तिखट खाण्याची इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा इथे तुमची पूर्ण होईल. कारण इथे स्पॅनिश चिली सॉस चुरोस सुद्धा फक्त 120 रुपयांना मिळतात. कोल्ड कॉफी सोबतच इथे मिळणाऱ्या वॉफलची चवसुद्धा उत्तम आहे.
advertisement
'चुरोस हा पदार्थ स्पेनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा पदार्थ ठाणेकरांनाही खाता यावा या उद्देशानेच आम्ही हे स्पॅनिश रेस्टॉरंट सुरू केले. चुरोस सोबतच आमच्या इथे चविष्ट वॉफल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड कॉफीसुद्धा मिळतात,' असे रेस्टॉरंट मॅनेजर सवीर यांनी सांगितले. स्पॅनिश पदार्थ मिळणाऱ्या या रेस्टॉरंटची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement
तर मग तुम्हालाही या स्पॅनिश रेस्टॉरंटमध्ये जाऊन स्पेनमध्ये प्रसिद्ध असणारा चुरोस या पदार्थाची चव चाखायची असेल तर तुम्ही या द बॉम्बे चुरोस स्पॅनिश रेस्टॉरंटला भेट देऊ शकतात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 15, 2024 5:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ठाण्यात याठिकाणी मिळतो स्पॅनिश चूरोस अन् वॉफल, रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा, हे आहे लोकेशन