Crime in Mumbai: फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक, साडेपाच कोटींची फसवणूक, पनवेलमध्ये अनघा पाटील यांनी जीवन संपवलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Panvel: फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीने पनवेलमधील अनघा पाटील (36) या महिलेची आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल 5 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
पनवेल: फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीने पनवेलमधील अनघा पाटील (३६) या महिलेची आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ५.३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या फसवणुकीमुळे आलेल्या नैराश्यातून अनघा पाटील यांनी आत्महत्या केली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी गुजरातच्या रवी हरेशभाई भडका नावाच्या आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२०२३ मध्ये एका ऑनलाइन आणि दिल्लीतील ऑफलाइन कोर्सदरम्यान अनघा पाटील यांची आरोपी रवी भडका याच्याशी ओळख झाली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये रवी भडकाने अनघा यांची भेट घेतली आणि त्यांना फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळत असल्याचं सांगितलं.
त्याने सुरुवातीला काही परतावा देऊन अनघा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. या विश्वासामुळे अनघा, त्यांचे वडील, भाऊ आणि पती यांनी रवी भडकाकडे कोट्यवधी रुपये गुंतवले. मात्र, त्यानंतर वर्षभरात आरोपीने कोणताही परतावा दिला नाही. उलट, त्याने अनघा यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.
advertisement
आत्महत्या आणि गुन्हा दाखल
आरोपीच्या त्रासाला कंटाळून ८ ऑक्टोबर २०२५ रोजी अनघा पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर अनघा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या बँक खात्याची तपासणी केली, तेव्हा ३८ लाख रुपये रवी भडका याला पाठवल्याचे आढळले. तसेच, आरोपीने अनघा आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून एकूण ५ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.
advertisement
आर्थिक फसवणूक आणि आरोपीच्या त्रासामुळे आलेल्या नैराश्यातून अनघा यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी शुक्रवारी (१ नोव्हेंबर २०२५) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रवी हरेशभाई भडका याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.
view commentsLocation :
Panvel,Raigad,Maharashtra
First Published :
November 02, 2025 8:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Crime in Mumbai: फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक, साडेपाच कोटींची फसवणूक, पनवेलमध्ये अनघा पाटील यांनी जीवन संपवलं


