Mumbai AC Local : लोकल प्रवाशांसाठी खुशखबर! लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार तब्बल 238 अत्याधुनिक वातानुकूलित गाड्या

Last Updated:

Mumbai AC Local : मुंबई उपनगरीय रेल्वेत लवकरच मोठा बदल होणार आहे. प्रवाशांना आरामदायी आणि सुखकर प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी तब्बल 238 अत्याधुनिक वातानुकूलित लोकल गाड्या दाखल होणार आहेत.

News18
News18
AC Local Trains : मुंबई लोकल हा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. दररोज लाखो प्रवासी या लोकलच्या मदतीने प्रवास करतात. वाढती लोकसंख्या आणि सतत वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता आता लोकल ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने यासाठी तयारी पूर्ण केली असून येत्या आठवड्यात तब्बल 238 एसी लोकल खरेदीसाठी निविदा काढण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी एमयूटीपी-3 आणि एमयूटीपी-3ए अंतर्गत सुमारे 19 हजार 293 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या नव्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा असणार आहेत. आतापर्यंतच्या एसी लोकलपेक्षा या लोकल अधिक अत्याधुनिक असतील. प्रवाशांच्या आरामासाठी गादीयुक्त आसने, प्रत्येक डब्यात मेट्रोप्रमाणे मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, तसेच गर्दीनुसार वातावरण नियंत्रित करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक एचव्हीएसी प्रणाली यांचा समावेश असेल. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास न होता प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
advertisement
गाड्यांच्या कार्यक्षमतेतही मोठी सुधारणा करण्यात येणार आहे. या लोकलमध्ये वाढीव विद्युत शक्ती असणार असून त्यामुळे गाड्या 130 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील. यामुळे स्थानकांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल. दरवाजे उघडणे आणि बंद करण्यासाठी होणारा वेळेचा अपव्यय नवीन तंत्रज्ञानामुळे कमी होणार आहे. एमयूटीपी-3 अंतर्गत 47 तर एमयूटीपी-3ए अंतर्गत तब्बल 191 एसी लोकल खरेदी केल्या जाणार आहेत. या निविदेत 12 आणि 15 डब्यांच्या लोकलसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
advertisement
या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे दोन नवीन ईएमयू कारशेडची उभारणी. नव्या लोकलच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेसाठी भिवपुरी येथे तर पश्चिम रेल्वेसाठी वाणगाव येथे ही कारशेड उभारली जाणार आहेत. यामुळे एसी लोकलच्या कार्यक्षम देखभालीला चालना मिळेल. विशेष म्हणजे ही कारशेड त्याच कंत्राटदारामार्फत चालविली जाणार आहेत, ज्याला एसी लोकलचे कंत्राट मिळेल.
advertisement
निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदार निवडण्यासाठी 3 ते 6 महिने लागतील. त्यानंतर दोन वर्षांच्या आत पहिली नमुना लोकल तयार होईल आणि पुढील मंजुरी प्रक्रिया सुरू होईल. यामुळे काही वर्षांत मुंबईकरांना अत्याधुनिक,जलद आणि आरामदायी लोकल प्रवासाचा अनुभव घेता येईल.
एकूणच पाहता, मुंबईकरांसाठी ही खुशखबर ठरणार आहे. दैनंदिन प्रवासातील थकवा, गर्दी आणि असुविधा कमी करण्यासाठी ही लोकल ट्रेन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वाढत्या प्रवासीसंख्येला तोंड देण्यासाठी आणि भविष्यातील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी हा प्रकल्प मोठा टप्पा मानला जात आहे. आगामी काळात मुंबईकरांसाठी ही एसी लोकल खऱ्या अर्थाने सुपर लोकल ठरेल यात शंका नाही.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai AC Local : लोकल प्रवाशांसाठी खुशखबर! लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार तब्बल 238 अत्याधुनिक वातानुकूलित गाड्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement