AC local : आनंदाची बातमी! आजपासून पश्चिम रेल्वेवर धावणार अधिक एसी लोकल; वाचा संपूर्ण वेळापत्रक
Last Updated:
Mumbai Ac Local Timetable : मुंबई पश्चिम रेल्वेत 26 जानेवारी 2026 पासून 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरु होत आहेत. फास्ट आणि स्लो गाड्या विरार, बोरिवली, भाईंदर आणि गोरेगाव मार्गावर अधिक आरामदायक प्रवासासाठी उपलब्ध असतील.
मुंबई : मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल रेल्वेत आता प्रवाशांना आणखी थंडावा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने आजपासून 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता उकाडा आणि गर्दी पाहता मुंबईकर एसी लोकलला अधिक पसंती देत आहेत.
मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखद
नवीन फेऱ्या विरार, बोरिवली, भाईंदर आणि गोरेगाव मार्गावर सुरु केल्या जात आहेत. यात अप दिशेला 6 आणि डाऊन दिशेला 6 अशा एकूण 12 फेऱ्या आहेत. यामध्ये फास्ट आणि स्लो गाड्या दोन्ही आहेत, जेणेकरून नोकरीवर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळेल. चला तर सविस्तर वेळापत्रक जाणून घेऊयात.
advertisement
1)अप मार्गावरील नव्या एसी लोकलचे वेळापत्रक
सकाळी 05:14 वाजता गोरेगावहून निघणारी स्लो लोकल सकाळी 06:11 वाजता चर्चगेटवर पोहोचेल.
सकाळी 07:25 वाजता बोरिवलीहून निघणारी फास्ट लोकल सकाळी 08:20 वाजता चर्चगेटवर पोहोचेल.
सकाळी 10:08 वाजता विरारहून निघणारी फास्ट लोकल सकाळी 11:27 वाजता चर्चगेटवर पोहोचेल.
दुपारी 12:44 वाजता भाईंदरहून निघणारी फास्ट लोकल दुपारी 13:48 वाजता चर्चगेटवर पोहोचेल.
advertisement
दुपारी 15:45 वाजता विरारहून निघणारी स्लो लोकल संध्याकाळी 17:09 वाजता चर्चगेटवर पोहोचेल.
संध्याकाळी 19:06 वाजता गोरेगावहून निघणारी स्लो लोकल रात्री 20:01 वाजता चर्चगेटवर पोहोचेल.
2) डाऊन मार्गावरील एसी लोकलचे नवे वेळापत्रक पाहा
सकाळी 06:14 वाजता चर्चगेटहून निघणारी स्लो लोकल सकाळी 07:19 वाजता बोरिवलीवर पोहोचेल.
सकाळी 08:27 वाजता चर्चगेटहून निघणारी फास्ट लोकल सकाळी 09:51 वाजता विरारवर पोहोचेल.
advertisement
सकाळी 11:30 वाजता चर्चगेटहून निघणारी फास्ट लोकल दुपारी 12:31 वाजता भाईंदरवर पोहोचेल.
दुपारी 13:52 वाजता चर्चगेटहून निघणारी स्लो लोकल दुपारी 15:36 वाजता विरारवर पोहोचेल.
संध्याकाळी 17:57 वाजता चर्चगेटहून निघणारी स्लो लोकल संध्याकाळी 18:51 वाजता गोरेगाववर पोहोचेल.
रात्री 20:07 वाजता चर्चगेटहून निघणारी स्लो लोकल रात्री 21:02 वाजता गोरेगाववर पोहोचेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 8:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
AC local : आनंदाची बातमी! आजपासून पश्चिम रेल्वेवर धावणार अधिक एसी लोकल; वाचा संपूर्ण वेळापत्रक










