advertisement

गुजराती टेलरनं केली मराठी महिलेला शिवीगाळ, मनसैनिकांनी महिलेच्या हातून टेलरला धुतलं; VIDEO

Last Updated:

मनसे नेते किरण नकाशे आणि विजय पाटील यांच्याविरोधात बोरिवली पश्चिम येथील एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई :  मुंबईतील बोरिवली पश्चिम भागात मनसे कार्यकर्त्यांनी एका गुजराती टेलर चालकाला मराठी महिलेकडून मारहाण करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते किरण नकाशे आणि विजय पाटील यांच्याविरोधात बोरिवली पश्चिम येथील एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीतील एक्सर गाव परिसरात राहणाऱ्या वैशाली म्हात्रे या स्थानिक मराठी महिलेचा शेजारील गुजराती लेडीज टेलर अर्वाच्य भाषेत वारंवार शिवीगाळ करत होता. तसेच त्याने धमक्या दिल्याचाही आरोप आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या वैशाली म्हात्रे यांनी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेलरकडून वर्तनात कोणताही बदल न झाल्याने अखेर त्यांनी मनसेच्या स्थानिक शाखेकडे धाव घेतली.
advertisement

महिलेकडूनच केली मारहाण 

यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित गुजराती टेलरला जाब विचारत त्याला महिलेकडूनच मारहाण करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. ज्या महिलेवर अन्याय झाला, तिच्याच हातून धुलाई करून न्याय दिला, असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.
व्हायरल व्हिडिओत मनसे कार्यकर्ते उपस्थित असताना गुजराती टेलरला मारहाण केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. या प्रकरणात मनसे नेते किरण नकाशे आणि विजय पाटील यांच्याविरोधात जबरदस्ती, मारहाण आणि कायदा हातात घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेवरून मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement

मिरा भाईंदरमध्ये भव्य मोर्चा

मिरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. यानंतर मनसे पदाधिकाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढला होता. दरम्यान, त्यानंतर मनसैनिकांसह मराठी माणसांनी मिळून मिरा भाईंदरमध्ये भव्य मोर्चा काढला होता.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
गुजराती टेलरनं केली मराठी महिलेला शिवीगाळ, मनसैनिकांनी महिलेच्या हातून टेलरला धुतलं; VIDEO
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement