हेल्दी पण घरगुती, दिव्यामध्ये मिळतायत कमी किंमतीत डायबिटीज फ्री अनेक पदार्थ; फूड बुटीक नक्की कुठेय?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
दिव्यातील निलम फूड बुटीक आरोग्यदायी आणि पूर्णतः घरगुती पदार्थांसाठी सध्या विशेष लोकप्रिय ठरत आहे.
दिव्यातील निलम फूड बुटीक आरोग्यदायी आणि पूर्णतः घरगुती पदार्थांसाठी सध्या विशेष लोकप्रिय ठरत आहे. निलम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्या या बुटीकची खासीयत म्हणजे गहू आणि गूळ वापरून तयार करण्यात येणारी मैदा- विरहित बिस्कीट्स. शुद्ध साहित्यातून, घरगुती पद्धतीने तयार झालेली ही बिस्किट्स केवळ चविष्टच नाहीत तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. विशेषतः डायबिटीस असणार्या व्यक्तींनाही ही बिस्किट्स सुरक्षितपणे खाता येतात ही बाब ग्राहकांमध्ये बुटीकप्रती अधिक विश्वास निर्माण करते.
बुटीकमध्ये गव्हाचे, नाचणीचे, खोबऱ्याचे आणि जिऱ्याचे विविध प्रकारचे पौष्टिक बिस्कीट्स उपलब्ध असून ग्राहकांकडून यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय नाचणीपासून बनवलेले पौष्टिक पोंगे, ऑनियन रिंग्स, तसेच साबुदाणा फेणी आणि बटाटा फेणी हेही पदार्थ येथे स्वतः तयार केले जातात. हे सर्व पदार्थ रसायन मुक्त, पौष्टिक आणि घरगुती गुणवत्तेचे असल्याने प्रत्येक पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. या पदार्थांच्या सेवनामुळे हाडांची ताकद वाढण्यास मदत होते, शरीरातील लोह व प्रोटीनची पातळी सुधारते, पाचनशक्ती वाढते तसेच डायबिटीज कंट्रोल करण्यातही हे पदार्थ सहाय्यक ठरतात.
advertisement
कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते अमिनो ॲसिडचे प्रमाण वाढवण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे या पदार्थांमुळे मिळतात. महिलांमध्ये लॅक्टेशन वाढवण्यास तसेच आयर्न आणि कॅल्शियमची पातळी सुधारण्यासही हे घरगुती खाद्यपदार्थ उपयुक्त मानले जातात. ग्राहकांच्या सोयीसाठी बुटीककडून 60 रुपयांचे एक पॅक आणि 100 रुपयांचे दोन पॅक अशी विशेष पॅकिंगची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन ऑर्डर आणि कस्टमाइज्ड ऑर्डरची सुविधाही उपलब्ध आहे. इच्छुकांनी 7506966013 या क्रमांकावर संपर्क साधून ऑर्डर देऊ शकतात. घरगुती, शुद्ध आणि आरोग्यदायी पदार्थांचा अद्वितीय स्वाद देत निलम गोरे यांचे निलम फूड बुटीक हे खाद्यप्रेमींसाठी एक आकर्षण केंद्र बनले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 7:39 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
हेल्दी पण घरगुती, दिव्यामध्ये मिळतायत कमी किंमतीत डायबिटीज फ्री अनेक पदार्थ; फूड बुटीक नक्की कुठेय?








