लग्नाचा बस्ता असो आणखी काही शुभकार्य, साड्यांचं बेस्ट मार्केट, व्यवसायासाठीही आहे भारीच!, फक्त 150 रुपयांपासून सुरुवात

Last Updated:

लग्नकार्य असो किंवा सण महिलांना साडी खरेदी करणे आवडते. साडी म्हणजे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. बजेट कमी असो किंवा जास्त पण साडी खरेदी करताना दुकानात गेल्यावर सगळ्यात उत्तम साडी कमीत कमी किमतीत खरेदी करण्याचा महिला वर्गाचा अट्टहास असतो.

+
नटराज

नटराज मार्केट मालाड

प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : महिलांना साडी हे सर्वात आकर्षक असे आऊट फिट आहे. पण अनेकदा साड्यांमधील इतके रंग, पॅटर्न्स आणि अनेक स्टाईल्समुळे काहीवेळा साड्या निवडणे हे कठीण होऊन बसते. पण एक ठिकाण असे आहे, ज्याठिकाणी तुम्ही लग्न, बस्ता आणि बिझनेससाठी होलसेल दरात साड्या खरेदी करू शकता. मालाड येथील नटराज मार्केट हे साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी 150 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या सर्व पॅटर्नमधील साड्या मिळतात. जाणून घेऊयात, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा खास आढावा.
advertisement
लग्नकार्य असो किंवा सण महिलांना साडी खरेदी करणे आवडते. साडी म्हणजे महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. बजेट कमी असो किंवा जास्त पण साडी खरेदी करताना दुकानात गेल्यावर सगळ्यात उत्तम साडी कमीत कमी किमतीत खरेदी करण्याचा महिला वर्गाचा अट्टहास असतो. त्यात प्रत्येकीला साडी खरेदी करताना चांगल्या क्वालिटीची साडीही स्वस्तात हवी असते. यासाठीच मुंबईतील नटराज मार्केट हे बेस्ट ऑप्शन आहे.
advertisement
याठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्त आणि होलसेल दरात साड्या मिळतात. यामध्ये पैठणी ही अशी साडी आहे, ज्याशिवाय महाराष्ट्रीयन लग्न सोहळा अपूर्ण आहे. त्यामुळे याठिकाणी तुम्हाला हव्या तशा आणि तुम्हाला आवडतील त्या रंगाच्या पैठणी मिळतात. या पैठणींची किंमत 800 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत अगदी स्वस्त दरात आहे. तसेच तुम्हाला काही वेगळं हवे असेल तर तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय साडी म्हणून बनारसी साडी हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
लग्न, इतर कोणतेही पारंपरिक कार्य घरात असेल अथवा कोणत्याही खास आणि शुभ दिवशी बनारसी साडी नेसणे महिलांना नक्कीच आवडते. त्यामुळे तुम्हाला पारंपरिक साडीमध्ये ब्रायडल लुक हवा असेल तर बनारसी हा अप्रतिम पर्याय तुमच्यासमोर नक्कीच आहे. या बनारसी साडीची किंमत ही 1 हजार रुपयांपासून सुरू होते. त्याचप्रमाणे ज्यांना होलसेल दरात बस्त्यासाठी किंवा बिजनेससाठी साड्या हव्या असतील त्यांच्यासाठी 150 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या वेगवेगळा डिजाइनचे कलेक्शन ही या नटराज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
Famous Beaches near Mumbai : मुंबई जवळचे हे 5 प्रसिद्ध बीच, पर्यटकांसाठी आहेत बेस्ट ऑप्शन, photos
यासोबतच बांधणी साडीमध्ये राजस्थान आणि गुजरातची रॉयल बंधेज साडी सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. याची किंमत ही अगदी 500 रुपयांपासून सुरू होते. तसेच चंदेरी साडी, कांजीवरम अथवा कांचिपुरम साडी, शालू साडी अशा अनेक प्रकारच्या साड्या या मार्केटमध्ये अगदी बजेट फ्रेंडली दरात ग्राहकांना मिळतात. तुम्हालाही स्वस्त दरात साड्या हव्या असतील तर तुम्ही या मार्केटमध्ये नक्की भेट देऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
लग्नाचा बस्ता असो आणखी काही शुभकार्य, साड्यांचं बेस्ट मार्केट, व्यवसायासाठीही आहे भारीच!, फक्त 150 रुपयांपासून सुरुवात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement