'मला पोलीसमध्ये भरती व्हायचंय..', कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विकतेय दूध, सोलापूरच्या कल्याणीच्या जिद्दीची कहाणी!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
गेल्या 10 वर्षांपासून कल्याणीचे वडील गवळी व्यवसाय करत आहे. तर कल्याणी गेल्या 4 वर्षापासुन वडिलांना दूध गोळा करुन ते विक्री करण्यासाठी मदत करत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : ग्रामीण भागातील बहुतांश मुले हे पोलीस भरतीचे स्वप्न पाहतात. यातच आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावत राहणाऱ्या तरुणीनेही पोलीसमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहिले आहे. तसेच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागील 4 वर्षांपासुन ही तरुणी दूध गोळा करुन विक्री करण्याचे काम करत आहे. कल्याणी बाबासाहेब पवार (रा. गुंजेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे या तरुणीचे नाव आहे.
advertisement
गेल्या 10 वर्षांपासून कल्याणीचे वडील गवळी व्यवसाय करत आहे. तर कल्याणी गेल्या 4 वर्षापासुन वडिलांना दूध गोळा करुन ते विक्री करण्यासाठी मदत करत आहे. कल्याणी हिच्या घरी 4 ते 5 म्हशी आहेत. दररोज कल्याणी 50 ते 60 लीटर दूध गोळा करून गावात विक्री करते. तसेच उरलेले दूध मोटारसायकलवर येऊन सोलापूर शहरात विक्री करते.
advertisement
कल्याणी पवार या तरुणीला पोलीसमध्ये भरती व्हायचे आहे. यासाठी ती मागील 4 वर्षांपासून वडिलांसोबत दूध गोळा करून विक्री करण्याचे काम करत आहे. कल्याणी पवार हिच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे कल्याणी आपल्या वडिलांसोबत दूध संकलन करून विक्री करण्याचे काम करत आहे.
54 एकर बांबूची शेती, कोट्यवधींची उलाढाल, एकेकाळी कर्जबाजारी असलेल्या व्यक्तीची प्रेरणादायी गोष्ट!
कल्याणी पवार ही तरुणी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. दूध विक्री करत कल्याणी पवार पोलीस भरतीची तयारीही करत आहे. सकाळी लवकर उठून दूध गोळा करून ती विक्री करते. मग संध्याकाळी कल्याणी पोलीस भरतीची तयारी करते.
advertisement
कल्याणी हिच्या कुटुंबात चार जण आहे. माझी मुलगी मुलापेक्षा कमी नाही. मुलांच्या बरोबरीने माझी मुलगी काम करत आहे. गावकऱ्यांच्या तोंडातून हे ऐकून मला समाधान वाटत आहे, असे मत कल्याणीची आई यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 06, 2024 6:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
'मला पोलीसमध्ये भरती व्हायचंय..', कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विकतेय दूध, सोलापूरच्या कल्याणीच्या जिद्दीची कहाणी!

