Railway Recruitment 2026 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे विभागात विविध पदांसाठी नवीन भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?
Last Updated:
Indian Railway Recruitment : रेल्वे विभागात नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर पाहावी.
मुंबई : रेल्वेत नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे मोठे स्वप्न असते. मात्र अनेक वेळा वयोमर्यादेमुळे उमेदवारांना अर्ज करता येत नाही. अशा उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने आइसोलेटेड कॅटेगरी भरती 2025 जाहीर केली असून काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा थेट 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर
जर तुम्ही नववर्षात सरकारी नोकरी मिळवण्याचा विचार केला असेल, तर ही संधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. RRB कडून चीफ लॉ असिस्टंट, पब्लिक प्रॉसिक्युटर, जूनियर ट्रान्सलेटर, सायंटिफिक असिस्टंट, लॅब असिस्टंट यांसारख्या विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
advertisement
अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि प्रक्रिया वाचा
इच्छुक आणि पात्र उमेदवार www.rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 31 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत काही पदांसाठी 44,900 रुपये, तर काही पदांसाठी 35,400 रुपये आणि 19,900 रुपये इतका मासिक पगार देण्यात येणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
advertisement
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून कायदा पदवी, पदव्युत्तर शिक्षण, 12वी विज्ञान शाखा अशा पात्रतेची आवश्यकता आहे. अर्ज करताना उमेदवारांनी लाईव्ह फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती, परीक्षा पद्धत आणि पात्रतेसाठी RRB Isolated Categories Recruitment 2025 Notification PDF डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचावी
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 11:15 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Recruitment 2026 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे विभागात विविध पदांसाठी नवीन भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?









