Vande Bharat Express : मोठी घोषणा! उन्हाळी गर्दीमुळे वंदे भारतमध्ये होणार मोठे बदल; प्रवाशांसाठी खास समर प्लॅन
Last Updated:
Vande Bharat Express : उन्हाळी सुट्टीत वाढलेल्या गर्दीमुळे वंदे भारत एक्स्प्रेसने एक मोठा निर्णय घेतलेला असून अजून एका एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे.
मुंबई : उन्हाळी सुट्टीत वाढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून पश्चिम रेल्वेने अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा प्रवाशांना मोठा फायदा होणार असून नेमके कोणते बदल होणार आहेत याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
वंदे भारतचा नवा अवतार
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस जी आहे, तिच्या डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या गाडीला आधी 16 डबे होते,मात्र आता प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ती 20 डब्यांसह धावणार आहे. घेतलेल्या या निर्णयामुळे अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार असून तिकिटांच्या उपलब्धतेतही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
कर्णावती एक्स्प्रेसमध्ये मोठे बदल
शिवाय मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या स्थानात बदल करण्यात आले आहे.आता ही गाडी मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुटणार आहे. गाडी वांद्रे टर्मिनसवरून दुपारी 1.55 वाजता रवाना होईल तर परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी 12.30 वाजता वांद्रे येथे पोहोचणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या बदलांमुळे गाडीच्या थांब्यांमध्ये आणि वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नियमित प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही.उन्हाळी सुट्टीच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. गर्दी कमी करण्यासोबतच प्रवास अधिक आरामदायी करण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेने केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 11:55 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vande Bharat Express : मोठी घोषणा! उन्हाळी गर्दीमुळे वंदे भारतमध्ये होणार मोठे बदल; प्रवाशांसाठी खास समर प्लॅन







