महिला गर्भाशयाची गाठ काढायला गेली; पण भूल देऊन केलं भलतंच कांड, पुण्यातील त्या 4 डॉक्टरांना कोर्टाचा दणका
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
केशवनगर परिसरात राहणाऱ्या एका ब्युटी पार्लर चालिका महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे सोनोग्राफीत आढळले होते. उपचारासाठी त्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी साई केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या.
पुणे: डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो, कारण ते अनेकांना अगदी मृत्यूच्या दारातून परत आणतात. मात्र, पुण्यात याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची एक धक्कादायक घटना समोर आली. मांजरी बुद्रुक येथील 'साई केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये एका ३५ वर्षीय महिलेची साधी गाठ काढायची होती. मात्र, गाठ काढायच्या नावाखाली चक्क तिचे संपूर्ण गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमित जोशी यांनी संबंधित चार डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
प्रकरण काय?
केशवनगर परिसरात राहणाऱ्या एका ब्युटी पार्लर चालिका महिलेच्या गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे सोनोग्राफीत आढळले होते. उपचारासाठी त्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी साई केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. मात्र, डॉक्टरांनी महिलेची किंवा त्यांच्या नातेवाईकांची कोणतीही पूर्वसंमती न घेता शस्त्रक्रिया करून तिचे संपूर्ण गर्भाशयच काढून टाकले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित महिलेने मांजरी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
advertisement
तपासात धक्कादायक वळण
सरकारी वकील अॅड. विश्वास सातपुते यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. "काढलेल्या गर्भाशयाचे या डॉक्टरांनी नेमके काय केले? ही अवयव तस्करी आहे का? की यामागे काही मोठा कट आहे?" असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेही या डॉक्टरांनी उपचारात अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचा अहवाल दिला आहे. यावरून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख आणि डॉ. मोहम्मद शेख या चौघांचा जामीन फेटाळला आहे.
advertisement
या घटनेमुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला जात असून, आता या डॉक्टरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 11:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
महिला गर्भाशयाची गाठ काढायला गेली; पण भूल देऊन केलं भलतंच कांड, पुण्यातील त्या 4 डॉक्टरांना कोर्टाचा दणका









