Mumbai Shocking News : मुंबईत भीषण प्रकार! प्रसिद्ध रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 2 महिलांना उंदरांचा चावा, नातेवाईकांचा संताप अनावर
Last Updated:
Cooper Hospital News : मुंबईत मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कूपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या दोन महिलांना उंदरांनी चावा घेतल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
मुंबई : अंधेरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि कूपर रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अवघ्या 24 तासांत दोन ज्येष्ठ रुग्णांना उंदरांनी गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
3 सप्टेंबर रोजी एका वृत्तपत्राने कूपर रुग्णालयातील उंदरांचा वाढता त्रास अधोरेखित केला होता. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे अंधेरी येथील 64 वर्षीय इंदुमती कदम आणि शुक्रवारी पहाटे 80 वर्षीय हुसैन बानो यांना उंदारांनी चावल्याची नोंद झाली. इंदुमती कदम यांच्या हाताला उंदाराने एवढे खोलवर कुतरले की हाड दिसू लागले. त्याच वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या हुसैन बानो यांच्या पायालाही शुक्रवारी पहाटे उंदराने जखमी केले होते.
advertisement
या संदर्भात रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम आंद्राडे यांनी सांगितले की,''रात्री पेस्ट कंट्रोल केला जाणार असून 500 रॅट ट्रॅप्स आणि स्टिकी ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. तसेच पूर्व डीन डॉ. मोहिते यांना पर्यवेक्षण समितीत समाविष्ट करण्यात आले आहे.''
इंदुमती कदम यांच्या जावयाने सांगितले की, प्रकृती बिघडल्यामुळे शनिवारी त्यांना सहाव्या मजल्यावरील महिला मेडिकल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री उंदराने त्यांच्या हाताला एवढी गंभीर जखम केली की सकाळी पाहिल्यावर रक्तबंबाळ हातातून हाड स्पष्ट दिसत होते. त्या सध्या शुद्धीवर नसून बोलण्याचीही स्थितीत नाही. डॉक्टरांनी पोलिसांना कळवण्याचे निर्देश दिले.
advertisement
दरम्यान, राम मंदिर परिसरातील हुसैन बानो यांनाही अशाच प्रकारे उंदराता फटका बसला. त्यांच्या मुलाने सांगितले की,''1 सप्टेंबर रोजी त्यांना दाखल केले होते. 5 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास उंदराने त्यांच्या पायाला चावा घेतला. त्यामुळे त्यांना खोल जखम झाली. डॉक्टरांच्या सूचनेनुसार आम्ही पोलिसांत एमएलसी नोंदवला.''
कुटुंबियांच्या भावनांमध्ये संताप आणि वेदना दोन्ही दिसून येत आहेत. इंदुमती कदम यांचा मुलगा म्हणाला की, ''आमची एकच मागणी आहे असे पुन्हा कोणत्याही रुग्णासोबत घडू नये.'' काही नातेवाईकांनी सांगितले की, ''येथे रात्री अनेक उंदिर फिरतात, त्यामुळे आता आम्हालाच जागे राहून रुग्णांवर लक्ष ठेवावे लागेल.''
advertisement
रुग्णालयातील एका सूत्राने उघड केले की, रुग्णालयातील साफसफाई आणि चूहा नियंत्रणाची जबाबदारी खासगी कंपनीकडे सोपवण्यात आली होती. परंतु, कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तत्कालीन डीन डॉ. सुधीर मेढेकर यांनी ती कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले होते. मात्र ते आदेश अद्याप अंमलात आले नाहीत.
या घटनांमुळे रुग्ण सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून बीएमसी प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. रुग्णालयातील उंदरांचा बंदोबस्त न केल्यास भविष्यात आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 9:49 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Shocking News : मुंबईत भीषण प्रकार! प्रसिद्ध रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 2 महिलांना उंदरांचा चावा, नातेवाईकांचा संताप अनावर


