Indian Railway : इंदौर-मुंबई एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट, 29 नोव्हेंबर नव्हे आता या तारखेपर्यंत धावणार ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Indian Railways Update : इंदौर–मुंबई तेजस एक्स्प्रेसच्या फेर्‍या पुन्हा वाढवल्याने प्रवाशांना आराम मिळाला आहे. जाणून घ्या कधीपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे.

News18
News18
मुंबई : भारतात अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आहेत, ज्याने दररोज लाखो संख्येने नागरिक प्रवास करत असतात. त्यातही भारतातील सर्वात महत्त्वाची असलेल्यापैंकी एका ट्रेनबाबत एक अपडेट समोर आलेली आहे. नक्की कोणत्या एक्सप्रेसबाबत माहिती समोर आलेली आहे ती जाणून घेऊयात.
इंदौर–मुंबई मार्गावरील ट्रेनमध्ये मोठा बदल
भारतीय रेल्वेने इंदौर–मुंबई दरम्यान धावणाऱ्या सेमी हायस्पीड तेजस एक्स्प्रेसच्या फेर्‍यांमध्ये पुन्हा वाढ केलेली आहे. आता ही ट्रेन 1 जानेवारीपर्यंत चालणार असून आता या फेर्‍या वाढवल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सोबतच अवंतिका आणि दूरंतो या मुंबईमार्गे धावणाऱ्या गाड्यांमधील आधीचा 140 ते 160 टक्के प्रवासी ताण कमी होऊन सुमारे 120 टक्क्यांवर आला आहे. विकेंड आणि सणासुदीच्या काळातही ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळत आहे. सध्या तेजस एक्स्प्रेसमध्ये 75 टक्के सीट्स फुल्ल आहेत.
advertisement
रेल्वे पीआरओ खेमराज मीना यांनी सांगितले की, तेजस एक्स्प्रेसच्या फेर्‍या वाढवण्याचा निर्णय आता घेण्यात आला असून मुंबई–इंदौर तेजस एक्स्प्रेसची सेवा आधी फक्त 28 नोव्हेंबरपर्यंतच सुरू होती,पण ती आता वाढवून 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. तसेच इंदौर–मुंबई तेजस एक्स्प्रेस जी 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार होती, ती आता 1 जानेवारीपर्यंत धावणार आहे. या गाडीचे आरक्षण सुरु झाले आहे.
advertisement
इंदौरमध्ये 23जुलैपासून सुरू
इंदौर–मुंबईदरम्यानची तेजस स्पेशल ट्रेन 23 जुलैपासून सुरू करण्यात आली होती.आठवड्यात चार दिवस ही ट्रेन चालवली जात होती. सुरुवातीला ट्रेन केवळ ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली होती, पण मागणी पाहता ती नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आणि आता फेर्‍या पुन्हा 1 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
मुंबई सेंट्रल–इंदौर स्पेशल (09085)
ही ट्रेन सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी मुंबई सेंट्रलवरून रात्री 11.20 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता इंदौर येथे पोहोचते.
advertisement
इंदौर–मुंबई सेंट्रल स्पेशल (09086)
ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी इंदौरहून संध्याकाळी 5 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Indian Railway : इंदौर-मुंबई एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट, 29 नोव्हेंबर नव्हे आता या तारखेपर्यंत धावणार ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement