Dadar Kabutarkhana : कबुतरांसाठी कारवर दाणे ठेवले… हायकोर्टाच्या आदेशाला चॅलेंज देणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी एका झटक्यात...

Last Updated:

Dadar Kabutarkhana : हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत लालबागमधील एका व्यक्तीने थेट कारवर कबुतरांसाठी दाणे ठेवण्यास सुरुवात केली. कबुतरांसाठीचा ही कृती त्या व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे.

कबुतरांसाठी कारवर दाणे ठेवले… हायकोर्टाच्या आदेशाला चॅलेंज देणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी एका झटक्यात...
कबुतरांसाठी कारवर दाणे ठेवले… हायकोर्टाच्या आदेशाला चॅलेंज देणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी एका झटक्यात...
मुंबई: मुंबई हायकोर्टाने दादरमधील कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास बंदी घातली. दादरमधील कबुतरखान्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील जैन समाज या मुद्यावरून आक्रमक झाल्याचे चित्र होते. हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत लालबागमधील एका व्यक्तीने थेट कारवर कबुतरांसाठी दाणे ठेवण्यास सुरुवात केली. कबुतरांसाठीचा ही कृती त्या व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे.
कबुतरांमुळे विविध आजार होत असल्याने मुंबईतील विविध ठिकाणचे लहान-मोठे कबुतरखाने बंद करण्यास सुरुवात झाली आहे. दादर येथील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाला होता. काही दिवसांपूर्वीच पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांनी ताडपत्री, शेडची मोडतोड केली. मात्र, दुसऱ्या दिवशी हायकोर्टाने आपल्या बंदीचा आदेश कायम ठेवला. त्यानंतरही काहींनी आणखी तीव्रपणे कबुतरांसाठी दाणे टाकण्यास सुरुवात केली.
advertisement
जैन समाजातील काही सदस्यांनी कबुतरांना अन्न पुरवण्यासाठी नवी पद्धत अवलंबली असल्याचे दिसून आले होते. दादर परिसरात कारच्या टपावर धान्याचा ट्रे ठेवून कबुतरांना दणे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. लालबागमधील महेंद्र संकलेचा यांनी या “फिडिंग कार”ची सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. या व्हिडीओत महेंद्र यांनी लवकरच आणखी 12 गाड्या सुरू होणार असल्याचे सांगितले होते. कोर्टाच्या आदेशानंतरही आपण कबुतरांसाठी अशी व्यवस्था करणार असल्याचे म्हटले. यावेळी महेंद्र यांनी अटकाव करणाऱ्यांना उलट सुनावत, माझ्याविरोधात तक्रार करा, काहीही करा मी अशाच प्रकारे कबुतरांना खाद्य देणार असल्याचे सांगितले.
advertisement

पोलिसांकडून कारवाई, कार जप्त...

महेंद्र संकलेचा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होऊ लागला होता. मुंबईतील चिराबाजार येथील गजदर स्ट्रीट येथील रहिवासी असलेले आरोपी महेंद्र डी. संकलेचा यांच्याविरुद्ध दादर (पश्चिम) येथील मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) जी-नॉर्थ वॉर्डमधील कनिष्ठ पर्यवेक्षक संदेश विक्रम मतकर (57) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी या संकलेचा यांनी कार जप्त केली. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हायकोर्टाच्या आदेशाविरोधात कारवाई केल्यानंतर पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत.
मराठी बातम्या/मुंबई/
Dadar Kabutarkhana : कबुतरांसाठी कारवर दाणे ठेवले… हायकोर्टाच्या आदेशाला चॅलेंज देणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी एका झटक्यात...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement