खवय्यांचं आवडीचे ठिकाण, जिथं मिळते 20 पेक्षा अधिक प्रकारची दाबेली, माटुंगा दाबेलीचं लोकेशन काय?

Last Updated:

Matunga dabeli - माटुंगा दाबेली या नावामुळेच अनेक जण इथे दाबेली खायला येतात. गेले 24 वर्ष ही दाबेली मुंबईमध्ये फेमस आहे. 2001 साली माटुंगा दाबेलीची सुरुवात झाली.

+
माटुंगा

माटुंगा दाबेली

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई - माटुंगा आणि खवय्यांचे एक अनोखे नाते आहे. त्यात अनेक खवय्यांना दाबेलीचे अनेक प्रकार खायला खूप आवडतात. तुम्हालाही दाबेलीचे खूप प्रकार खायला आवडत असतील तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
माटुंगा स्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या माटुंगा दाबेली या दुकानात तुम्हाला दाबेलीचे 20 हून अधिक प्रकार मिळतील. यामध्ये साधा दाबेली, बटर दाबेली, चीज दाबेली, चीज गार्लिक दाबेली, शेवपुरी दाबेली, गडबड दाबेली, ओव्हरलोड चीज दाबेली, ओवरलोड चीज गार्लिक दाबेली, चीज शेवपुरी दाबेली या सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. या सगळ्या दाबेलींची किंमत फक्त 30 ते 40 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
माटुंगा दाबेली या नावामुळेच अनेक जण इथे दाबेली खायला येतात. गेले 24 वर्ष ही दाबेली मुंबईमध्ये फेमस आहे. 2001 साली माटुंगा दाबेलीची सुरुवात झाली. तेव्हा फक्त साधा दाबेली आणि बटर दाबेली या दोनच प्रकारच्या दाबेली इथे मिळत होत्या. मात्र, हळूहळू खवय्यांचा प्रतिसाद म्हणून इतरही सगळ्या गोष्टींची सुरुवात इथे झाली. एका छोट्या हात गाडीवर सुरू झालेला हा व्यवसाय आता मोठा झाला आहे.
advertisement
सुरुवातीला होते दोनच प्रकार - 
'सुरुवातीला जेव्हा आम्ही दुकान सुरू केले, तेव्हा माटुंगा दाबेली या दुकानात आमच्या फक्त 2 प्रकारच्या दाबेली मिळत होत्या. मात्र, आता तरुणाईच्या आवडीप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या दाबेली आणल्या आहेत. 2001 मध्ये मी आणि माझ्या वडिलांनी या दुकानाची सुरुवात केली. त्यावेळेस आमची दाबेली इतकी प्रसिद्ध होईल, असे आम्हाला कधीच वाटलं नव्हते हे सगळे खवय्यांचे आणि माटुंगाकरांचे प्रेम आहे,' असे माटुंगा दाबेलीचे व्यावसायिक किर्ती सोनी यांनी सांगितले.
advertisement
तर मग तुम्हालाही जर दाबेलीचे हे हटके प्रकार ट्राय करायचे असतील तुम्ही माटुंगा येथील या माटुंगा दाबेलीला नक्की भेट देऊन येथील्या दाबेलींची चव चाखू शकता.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
खवय्यांचं आवडीचे ठिकाण, जिथं मिळते 20 पेक्षा अधिक प्रकारची दाबेली, माटुंगा दाबेलीचं लोकेशन काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement