Metro Line 9 : मीरा-भाईंदरकरांसाठी खुशखबर; मेट्रो लाईन-9 मुळे अंधेरीपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी, कधी सुरू होणार सेवा?

Last Updated:

मेट्रो लाईन-9 सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदर आणि दहिसर परिसरातील लाखो प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

News18
News18
मुंबई : मीरा-भाईंदर आणि दहिसर परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रो लाईन-9 चा सीएमआरएसचा अंतिम टप्प्यातील निरीक्षण सुरू असून लवकरच ही मेट्रो सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही मेट्रो लाईन पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या समांतर धावणार असून दहिसर चेकनाका परिसरातून जात रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे.
मेट्रो लाईन-9 लवकरच प्रवाशांच्या सेवेत
गेल्या दोन महिन्यांपासून एमएमआरडीए आणि राज्य सरकार स्तरावर मेट्रोच्या उद्घाटनासाठी तयारी सुरू होती. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची योजना होती. मात्र महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता अपेक्षेपेक्षा आधी लागू झाल्याने उद्घाटनाला उशिर झाला आहे. त्यामुळे आता 15 जानेवारीनंतर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
मेट्रो-9 ही मेट्रो लाईन-7 ची वाढीव सेवा असून ऑक्टोबर 2024 मध्ये लाईन-7 सुरु करण्यात आली होती. या एकत्रित कॉरिडॉरमुळे मीरा-भाईंदरहून अंधेरीपर्यंत प्रवाशांना इंटरचेंज न करता प्रवास करता येणार आहे. भविष्यात ही लाईन थेट विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार असून तिला लाईन-7ए असे नाव देण्यात येईल. सप्टेंबर 2025 पर्यंत या कामाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण झाले आहे.
advertisement
किती असतील स्थानकं?
मेट्रो-9 च्या पहिल्या टप्प्यात 4.5 किमी लांबीचा मार्ग असून चार स्थानके असतील. पुढील टप्प्यात आणखी चार स्थानकांचा समावेश करून लाईन भाईंदरमधील सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंत नेण्यात येणार आहे. सुमारे 6,607 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारली जाणारी ही मेट्रो प्रकल्प दहिसर, मीरा रोड आणि भाईंदरमधील लाखो प्रवाशांसाठी सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Metro Line 9 : मीरा-भाईंदरकरांसाठी खुशखबर; मेट्रो लाईन-9 मुळे अंधेरीपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी, कधी सुरू होणार सेवा?
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement