Mumbai : बीडीडी चाळ रहिवाशांसाठी मोठा निर्णय! घरभाड्याचे नवे दर ठरले, असा होणार हजारो कुटुंबांना फायदा

Last Updated:

BDD Chawl Worli Rent Hike News : बी़डीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने घरभाडे 25 हजारांवरून 30 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यास रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

News18
News18
मुंबई : मुंबई शहरातील बीडीडी चाळींच्या रहिवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यांना दरमहा 30 हजार रुपये घरभाडे मिळणार आहे. मात्र यापूर्वी किती घरभाडे दिले जात होते आणि अडचण नेमकी काय होती ते जाणून घेऊया.
बीडीडी रहिवाशांची मागणी मान्य
म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक असल्याने पात्र रहिवाशांना दरमहा घरभाडे दिले जाते. आतापर्यंत मंडळाकडून दरमहा 25 हजार रुपये घरभाडे दिले जात होते.
पुनर्विकासातील रहिवाशांचे आर्थिक गणित कोलमडले
मात्र सद्यस्थितीत या परिसरात 25 हजार रुपयांत भाड्याचे घर मिळणे कठीण झाले आहे. घरभाड्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने रहिवाशांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत होता. त्यामुळे घरभाड्याची रक्कम वाढवून देण्याची मागणी रहिवाशांनी सातत्याने म्हाडाकडे केली होती.
advertisement
दरमहा 30 हजार रुपयांचा निर्णय
या मागणीची दखल घेत म्हाडाच्या मुंबई मंडळाने दरमहा घरभाडे 30 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर रहिवाशांना दरमहा 30 हजार रुपये घरभाडे देण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी काही रहिवाशांचे स्थलांतर संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये करण्यात आले होते. मात्र आता तेथे गाळे उपलब्ध नसल्याने उर्वरित पात्र रहिवाशांना घरभाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
म्हाडाच्या या निर्णयाचे बीडीडी चाळीतील रहिवाशांनी स्वागत केले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून घरभाड्याच्या रकमेत कोणतीही वाढ झाली नव्हती. त्यामुळे ही वाढ रहिवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : बीडीडी चाळ रहिवाशांसाठी मोठा निर्णय! घरभाड्याचे नवे दर ठरले, असा होणार हजारो कुटुंबांना फायदा
Next Article
advertisement
Mayor Reservation Lottery List:  २९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोणाची वर्णी?
२९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोण
  • २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार

  • या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले

  • नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.

View All
advertisement