Municipal Election : 'मियॉ भाई' विरूद्ध 'भाईजान', मिरा भाईंदरमध्ये वातावरण तापलं, सरनाईक मेहता भिडले

Last Updated:

मीरा-भाईंदरच्या राजकारणात ‘भाईजान’ आणि ‘मियाँ भाई’ या शब्दांवरून भाजपचे नरेंद्र मेहता आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक भिडले आहेत.

mira bhaynder municipal corporation 2026,
mira bhaynder municipal corporation 2026,
Mira Bhaynder Municipale Election 2026 : दिपाली मिश्रा, प्रतिनिधी, मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती तुटली आहे. ही युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये प्रचारा दरम्यान तीव्र संघर्ष समोर येत आहे. त्यामुळेच आता मीरा-भाईंदरच्या राजकारणात ‘भाईजान’ आणि ‘मियाँ भाई’ या शब्दांवरून भाजपचे नरेंद्र मेहता आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक भिडले आहेत.
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांना ‘भाईजान’ असे संबोधले आहे. सरनाईक हे चोरीछुपे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला पाठिंबा देत असल्याचा आरोप नरेंद्र मेहता यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी प्रताप सरनाईक यांना ‘भाईजान’ अशी उपमा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दुसऱ्या बाजूला, या आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना ‘मियाँ भाई’ असे संबोधले आहे. नरेंद्र मेहता यांनी एमआयएमसोबत चोरीछुपे युती केली असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नरेंद्र मेहता यांना ‘मियाँ भाई’ अशी संज्ञा दिल्याचे बोलले जात आहे.
advertisement
या ‘भाईजान’ आणि ‘मियाँ भाई’च्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मीरा-भाईंदरचे राजकारण अधिक तापले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे.
दरम्यान, पाथक झोरा परिसरात सरनाईक यांनी हनुमान मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर या हनुमान मंदिराला भव्य स्वरूप देण्याचे आश्वासन दिले. “हे मंदिर भविष्यात भव्य हनुमान मंदिर म्हणून विकसित केले जाईल,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
advertisement
सरनाईक यांना ‘बजरंगी भाईजान’ असे संबोधले जात असले तरी ते स्वतः हनुमान भक्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हनुमानाने ज्या प्रकारे लंकेचे दहन केले, त्याचप्रमाणे मीरा-भाईंदरमध्ये अन्याय, भ्रष्टाचार आणि असत्याचे दहन करून शांतता आणि विकास प्रस्थापित करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Municipal Election : 'मियॉ भाई' विरूद्ध 'भाईजान', मिरा भाईंदरमध्ये वातावरण तापलं, सरनाईक मेहता भिडले
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement