उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचं पण तिकीट नाही, टेन्शन नॉट! ST कडून 764 जादा फेऱ्या
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
ST Bus: उन्हाळ्यात एसटी बसला प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे या काळात लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्या अतिरिक्त सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्याचा आनंद लुटतात. गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने यंदाही 764 अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. 15 एप्रिल 2025 ते 15 जून 2025 या कालावधीत ही विशेष सेवा उपलब्ध असेल. दररोजच्या नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त चालवल्या जाणाऱ्या या बसमुळे प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
जादा फेऱ्यांचे नियोजन कसे असेल?
उन्हाळ्याच्या सुट्टीत लांब पल्ल्याच्या मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या शालेय फेऱ्या तात्पुरत्या रद्द करून त्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. एसटीच्या 764 जादा फेऱ्या राज्यभरात विविध मार्गांवर धावतील. यामुळे दररोज साधारण 2.50 लाख किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे.
advertisement
आरक्षणासाठी सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी या सर्व जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवासी खालील माध्यमांतून सहज आरक्षण करू शकतात:
1) वेबसाईट: www.msrtc.maharashtra.gov.in
2) आरक्षण पोर्टल: https://npublic.msrtcors.com/
3) बसस्थानक आरक्षण केंद्रे: सर्व प्रमुख बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर
प्रवाशांसाठी सूचना
एसटी महामंडळाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि आगाऊ आरक्षण करून निश्चित सीट बुक करावी. तसेच अधिकृत संकेतस्थळ आणि अँपद्वारेच तिकीट आरक्षित करावे, जेणेकरून कोणत्याही फसवणुकीपासून वाचता येईल.
advertisement
सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी एसटी
उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित आणि आरामदायी प्रवासात लुटण्यासाठी एसटीची अतिरिक्त बस सेवा एक उत्तम पर्याय आहे. वेळेवर आणि विनासायास पोहोचण्यासाठी आजच आगाऊ आरक्षण करा, असं आवाहन करण्यात आलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 27, 2025 12:00 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचं पण तिकीट नाही, टेन्शन नॉट! ST कडून 764 जादा फेऱ्या