HSRP नंबर प्लेटला तात्पुरता ब्रेक, पुण्यात भलताच गोंधळ, पण कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
HSRP Number Plates: पुण्यात HSRP नंबर प्लेटवरून गोंधळ कायम आहे. आता उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची मोहीम तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : देशात सर्वच वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (HSRP Number Plate) बसवणे अनिवार्य केले आहे. परंतु, पुण्यात HSRP नंबर प्लेटवरून गोंधळ सुरू आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी आणि हस्तांतरणासाठी गर्दी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पुण्यात सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची मोहीमच तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या विक्रेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असणाऱ्या वाहनांना परिवहन विभागाने सुरक्षा नंबर प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. 30 जूनपर्यंत या नंबरप्लेट बसवण्याची अंतिम मुदत देण्यात आलीये. परंतु, परिवहन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना सातत्याने त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कधी वेबसाईट बंट, तर कधी अचानक केंद्रच बंद अशी स्थिती असून वाहनधारकांना सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यातच नोंदणी केली तरीही वेळेवर नंबरप्लेट येत नसल्याच्या तक्रारींनी नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता नवीच समस्या निर्माण झाली आहे.
advertisement
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी
गुढीपाडव्याचा मुहूर्तावर अनेकजण वाहन खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांच्या सेवेला प्राधान्य देण्यासाठी वाहनांच्या शोरुमचालकांनी थेट सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकच शोरूमचालकांनी लावले आहेत. त्यामुळे तारीख घेतलेल्या लोकांना नाहक केंद्राच्या चकरा माराव्या लागत आहेत.
advertisement
केंद्र वाढवण्याच्या सूचना
पुण्यात सुरक्षा नंबरप्लेट बसविण्याचे काम रोझमाटां कंपनीला दिले आहे. आरटीओकडून कंपनीच्या अधिकाऱ्यांना नंबर प्लेट बदलण्यासाठी केंद्रे वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही या केंद्रांची संख्या अद्याप वाढवण्यात आलेली नाही. त्यात 20 ते 31 मार्च दरम्यान नंबरप्लेट बसविली जाणार नाही, असे बोर्ड शोरुमचालकांनी लागवले आहेत. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार एका वाहनधारकाने केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 27, 2025 9:50 AM IST