खूशखबर! यंदा मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; काय आहे कारण?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जलाशयांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. 7 तलावांत मिळून सध्या 95.75 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
मुंबई: मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे 7 तलाव भरले आहेत. सर्व तलावांत मिळून सध्या 13 लाख 85 हजार 834 दसलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. हा जलसाठा एकूण क्षमतेच्या 95.75 टक्के आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना दिलासा मिळणार असून पाण्याची चिंता मिटणार आहे.
मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या 7 जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. नुकतेच मुंबईतील तलावांबाबत एका नागरी संस्थेने आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये तानसा तलावात 98.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मोडक सागर पूर्ण क्षमतेने भरले असून 100 टक्के पाणीपातळी आहे. तसेच मध्य वैतरणा 98.18 टक्के, अप्पर वैतरणा 95.33 टक्के, भातसा 93.69 टक्के भरले आहे. तर विहार आणि तुलसी जलाशयांत 100 टक्के पाणीसाठा आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जलाशयांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. 4 जुलै रोजी मध्य वैतरणा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. तर 25 जुलै रोजीच विहार आणि मोडक सागर ओसंडून वाहू लागले. 24 जुलैला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तानसा तलाव ओव्हरफ्लो झाला. गेल्या 17 दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
advertisement
मराठवाडा, विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस, मुंबई पुण्यात अशी राहणार परिस्थिती, VIDEO
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 95.75 टक्के पाणीसाठा झाला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2024 11:03 AM IST


