advertisement

BEST Bus: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 1 मार्चपासून बेस्टच्या 'या' मार्गांवरील बसच्या रूट्स बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

Last Updated:

बेस्टच्या अनेक बसेसच्या रूट्समध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. प्रवाशांच्या मागणीमुळे बेस्टकडून अनेक मार्गांमध्ये बदल होणार आहे. तर अनेक साध्या बसेसचे रूपांतर एसी बसेसमध्ये केले जाणार आहे.

mumbai best buses updates best announce route changes ac bus expansions for several services from march 1 check details here
mumbai best buses updates best announce route changes ac bus expansions for several services from march 1 check details here
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून अनेक बसच्या रूट्समध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. प्रवाशांच्या मागणीमुळे बेस्टकडून अनेक मार्गांमध्ये बदल होणार आहे. अनेक साध्या बसेसच्या मार्गांमध्ये बदल केला जाणार असून काही मार्गांवरील साध्या बसेसचे रूपांतर एसी बसेसमध्ये केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळणार असून कोण कोणत्या मार्गांवरील बसेसच्या मार्गांमध्ये बदल होणार आहे, जाणून घेऊया...
A-6 या बस मार्गावरील ही बस बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावणार आहे. A-22 या मार्गावरील बस विजय वल्लभ चौकाऐवजी जिजामाता उद्यान (राणीचा बाग) ते मजास आगारापर्यंत धावणार आहे. 69 बस वडाळा आगाराऐवजी शिवडीमधील प्रबोधनकार ठाकरे उद्यानापर्यंत धावणार आहे. A- 515 या मार्गावरील बस सीप्झ गावाऐवजी सीप्झ बस स्टॉपर्यंत धावणार आहे. मुंबई सीएसएमटी ते सांताक्रुझ डेपो या मार्गावर धावणारी A-1 बसच्या मार्गामध्येही बदल केला आहे. A-1 ही बस बांद्रा रिक्लेमेशन आणि बांद्रा पश्चिम बस स्टॉपवरील वळसा बंद करून माहीम कोळीवाडा ते बांद्रा टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोड मार्गावरून धावणार आहे.
advertisement
A-101 या बसच्या मार्गातही आणखी वाढ होणार आहे. मुंबई सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंट्रल या मार्गावर धावणारी बस आता महात्मा फुले मंडईपर्यंत वाढवली आहे. या बसचा परतीचा प्रवास डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकमार्गे होणार आहे. अनेक बसेसच्या मार्गांमध्ये बदल केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शिवाय, अनेक मार्गांवरील साध्या बसेसचं रूपांतर आता एसी बसेसमध्ये केले जाणार आहे. आरसी चर्च ते नेहरू उद्यान मार्गावर धावणारी A- 903 बस, शास्त्री नगर ते चांदिवली बस स्टॉप पश्चिम मार्गावर धावणारी A- 324 बस, अंधेरी स्थानक पश्चिम ते मिल्लतनगर मार्गावर धावणारी A- 326 बस, अंधेरी स्थानक पश्चिम ते रमेशनगर मार्गावर धावणारी A- 346 बस
advertisement
अंधेरी स्थानक पश्चिम ते वीरा देसाई मार्गावर मार्गावर धावणारी A- 354 बस, माहुल गाव ते कुलाबा बस स्टेशन पूर्व मार्गावर धावणारी A- 381 बस आणि माजगाव आगार ते ठाण्यातील मुंब्रा फाटा मार्गावर धावणारी A- 412 बस या सर्व मार्गावरील साध्या बसेसचे रूपांतर एसी बसेसमध्ये झाले आहे. कोणत्याही मार्गावरील सेवा बंद न करता सर्व मार्गांवरील सेवा वाढवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. ज्या मार्गावर प्रवासांची संख्या फार कमी आहे, त्या मार्गांवरील सेवा बेस्टने विस्तारली असल्याची माहिती बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BEST Bus: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 1 मार्चपासून बेस्टच्या 'या' मार्गांवरील बसच्या रूट्स बदल; जाणून घ्या एका क्लिकवर
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement