घाटकोपर होर्डिंग प्रकरणी नवा VIDEO समोर, काळजात धडकी भरवणारे ते 3 सेकंद
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
हे होर्डिंग कोसळलं तेव्हा रस्त्यावरुन जाणाऱ्या कारमधील एका प्रवाशाने ती दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
मुंबई : मुंबईत सोमवारी झालेल्या अवकाळी पावसानं दाणादाण उडवली, त्याच वेळी घाटकोपरमध्ये भलमोठं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या होर्डिंग प्रकरणात आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हून अधिक लोक जखमी आहेत. नियमांना कचऱ्याची टोपली दाखवून हे होर्डिंग अनधिकृतपणे त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं. इतकच नाही तर होर्डिंगसंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. या सगळ्याला केराची टोपली दाखवून होर्डिंग तसंच ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.
advertisement
हे होर्डिंग कोसळलं तेव्हा रस्त्यावरुन जाणाऱ्या कारमधील एका प्रवाशाने ती दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की होर्डिंग कोसळतं तेव्हा किती मोठं नुकसान होत आहे. पेट्रोल पंपाशेजारुन कार जात असताना भलंमोठं होर्डिंग कोसळत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.
advertisement
घाटकोपर होर्डिंग प्रकरणी नवा VIDEO समोर, ही दृश्यं पाहून काळजात भरेल धडकी pic.twitter.com/qYbZoZAQ5o
— News18Lokmat (@News18lokmat) May 15, 2024
सोमवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाशेजारी असलेलं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. 120 बाय 120 फूट आकाराचं होर्डिंग कोसळल्याने जवळपास 100 लोक अडकले होते. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला.
advertisement
दुर्घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे 65 जवानांकडून 20 मशिनद्वारे बचावकार्य सुरू आहे. आता होर्डिंगच्या मलब्याखाली कोणीही अडकलेलं नाही. मात्र पेट्रोल पंपाला आग लागल्याची घटना समोर आलीय. अचानक लागलेल्या आगीमुळे आणखी कोणती दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांना दूर हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 15, 2024 11:42 AM IST


