Mumbai Local: मुंबईकरांचा रांगेतला वेळ वाचणार, आता थेट व्हॉट्सॲपवरच लोकलचं तिकीट!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांचा रांगेतला वेळ आता वाचणार आहे. मुंबई मेट्रोनंतर आता मुंबईच्या लोकलचे तिकीट देखील व्हॉट्सअॅपवरच मिळणार आहे.
मुंबई: मुंबईची लोकलसेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी व्हावा, असा रेल्वे प्रशासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. आता लोकलची तिकीट प्रणाली देखील सोपी करण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहेत. त्यासाठी व्हॉट्सॲप सारख्या ॲपद्वारे तिकीट काढण्याची प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत इच्छुक संस्थांसोबत बैठक झाली असून सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा विचार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय रेल्वेची तिकीट प्रणाली डिजिटल इंडिया योजनेच्या अंतर्गत डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून कॅशलेस आणि जलद तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवाशांना सोईस्कर तिकीट प्रणाली बनवण्याचे प्रयत्न आहेत. त्यासठी अनेक पर्यायंचा विचार असून चॅट बेस तिकीट प्रणाली हा त्याचाच एक भाग असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
advertisement
पश्चिम रेल्वे नोडल एजन्सी
सध्या रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी 25 टक्के प्रवासी डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत. हा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या डिजिटल तिकीट प्रणालीसोबतच तिकीट प्रणाली आणखी सोयीस्कर करण्याचे रेल्वेचे प्रयत्न आहेत. त्यासाठी चॅट आधारित प्रणाली विकसित करण्यावर रेल्वेचा भर असून पश्चिम रेल्वेला नोडल एजन्सी म्हमून नेमण्यात आले आहे. त्यांच्यावर ही प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी आहे.
advertisement
मुंबई मेट्रोत व्हॉट्सॲपचा वापर
मुंबई मेट्रोमध्ये गेल्या काही काळापासून तिकीट काढण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करण्यात येत आहे. तिकीट खिडकीवर असलेला क्युआर कोड स्कॅन केल्यावर चॅट उघडते. त्यावर हाय मेसेज पाठवल्यावर कुठले तिकीट काढायचे आहे त्याचे पर्याय दिले जातात. त्यानंतर पैसे भरल्यावर डिजिटल तिकीट उपलब्ध होते. सध्या मुंबई मेट्रोचे 67 टक्के तिकीट याच पद्धतीने काढले जात आहेत. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांना देखील व्हॉट्सअॅप तिकीट सेवेचा फायदा होणार आहे.
advertisement
अडचणी काय?
view commentsलोकल सेवेला व्हॉट्सॲप तिकीट प्रणाली विकसित करताना काही अडचणींना देखील सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी अनेक बाबींची पूर्तता करावी लागेल. कारण सध्या यूटीएसच्या माध्यमातून क्युआर पद्धतीच्या तिकीट प्रणालीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे अशा पळवाटा रोखता याव्यात, यासाठी नवीन प्रणाली विकसित करतानाच खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 10:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकरांचा रांगेतला वेळ वाचणार, आता थेट व्हॉट्सॲपवरच लोकलचं तिकीट!


