Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी रेल्वेचं खास गिफ्ट, मुंबई-मनमाड स्पेशल ट्रेन, बुकिंग कधी?

Last Updated:

Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एलटीटी ते मनमानड 6 विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.

Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी रेल्वेचं खास गिफ्ट, मुंबई-मनमाड 6 स्पेशल ट्रेन, बुकिंग कधी?
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी रेल्वेचं खास गिफ्ट, मुंबई-मनमाड 6 स्पेशल ट्रेन, बुकिंग कधी?
मुंबई: कोकणचा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. गणेश उत्सवासाठी मुंबईसह उपनगरांतून लाखो चाकरमानी कोकणात जात असतात. त्यात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. यंदा गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून कोकण आणि मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केलीये. गणेश उत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान सहा विशेष रेल्वे फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मनमानड गणपती विशेष रेल्वे 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. या गाडीचे आरक्षण 5 ऑगस्टला खुले होणार आहे. आता वाढलेल्या फेऱ्यांसह गणेशोत्सव काळात मध्ये रेल्वेवर विशेष फेऱ्यांची संख्या 302 पर्यंत पोहोचली आहे.
advertisement
कसं असेल वेळापत्रक?
लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव – एलटीटी साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्र. 01003/4) ही विशेष गाडी दर सोमवारी धावणार आहे. एलटीटीहून सोमवारी सकाळी 8.20 वाजता ही गाडी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता ती मडगावला पोहोचेल. तर मडगाव येथून दर रविवारी दुपारी 4.30 वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी एलटीटी येथे सकाळी 6 वाजता पोहोचेल.
advertisement
थांबे कुठे?
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष रेल्वेला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या ठिकाणी थांबे असतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी रेल्वेचं खास गिफ्ट, मुंबई-मनमाड स्पेशल ट्रेन, बुकिंग कधी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement