Mumbai Local: आता लोकल बदलायचं नो टेन्शन! लवकरच कर्जत - पनवेल थेट प्रवास
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांना आता कर्जत – पनवेल प्रवासासाठी लोकल बदलावी लागणार नाही. लवकरच थेट लोकल प्रवास सुरू होणार आहे.
मुंबई: मुंबईकरांना आता पनवेल आणि कर्जतला जायला लोकल बदलावी लागणार नाही. कारण मुंबई-कर्जत-पनवेल असा थेट प्रवास लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कमी होतील आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग ठरणारा कर्जत-पनवेल रेल्वे कॉरिडॉर लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. जवळपास 29.6 किमी लांबीच्या या मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3 (MUTP-3) अंतर्गत हाती घेतलेल्या या प्रकल्पासाठी 2,782 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्याने कर्जत आणि पनवेलमधील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच कमी होणार नाही तर मुंबईच्या उपनगरातील वाहतुकीवरील ताण देखील काही प्रमाणात कमी होईल.
बोगदे आणि पूल बांधकामाचा टप्पा पूर्ण
हा मार्ग डोंगराळ प्रदेशातून जात असल्याने यासाठी वावरले, नधाळ आणि किरवली येथे तीन बोगदे तयार करण्यात आले आहेत. तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय 47 पुलांपैकी 29 छोटे आणि 6 मोठे पूल पूर्ण झाले आहेत.
advertisement
नवीन दुहेरी मार्गिकेचा फायदा
यापूर्वी या मार्गावर फक्त मालगाड्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या धावत होत्या. मात्र, नवीन दुहेरी मार्गिकेमुळे लोकल गाड्या थेट कर्जत-पनवेल मार्गे धावू शकतील, त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल.
महत्त्वाची स्थानके
या मार्गावर पनवेल, मोहोपे आणि कर्जत अशी तीन महत्त्वाची स्थानके असतील. दोन जुन्या स्थानकांना नव्या मार्गिकेशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीत मोठा बदल होईल आणि स्थानिक तसेच प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2025 9:08 AM IST