Mumbai Local: 317 लोकल रद्द, सुट्टीनिमित्त घराबाहेर पडाल तर फसाल, या मार्गावर 30 दिवसांचा मेगाब्लॉक
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून वीकेंडला 317 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई: पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी पुढील काही दिवस अडचणीचे ठरणार आहेत. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील कामांसाठी पश्चिम रेल्वेने 30 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकचा सर्वाधिक परिणाम 26 आणि 27 डिसेंबर रोजी होणार असून, या दोन दिवसांत एकूण 317 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
26–27 डिसेंबरला मोठा परिणाम
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, 26 आणि 27 डिसेंबर रोजी रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर लोकल सेवा प्रभावित राहणार आहे. या कालावधीत लोकलच्या एकूण 317 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये शनिवारी (27 डिसेंबर) तब्बल 277 लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
advertisement
महिनाभर चालणार मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेचा हा मेगाब्लॉक 18 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात कांदिवली–बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये ट्रॅकशी संबंधित कामे, सिग्नलिंग यंत्रणेतील बदल तसेच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे.
advertisement
लोकल फक्त गोरेगावपर्यंत
मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. काही लोकल गाड्या फक्त गोरेगावपर्यंतच चालवल्या जाणार आहेत तसेच काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याबरोबरच काही लोकल नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावण्याची शक्यता आहे. यामुळे नियमित प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, मेगाब्लॉकदरम्यान रद्द किंवा बदललेल्या लोकल सेवांची माहिती अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा सोशल मीडिया हँडल्सवरून घ्यावी. गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करूनच प्रवास करावा, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 8:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: 317 लोकल रद्द, सुट्टीनिमित्त घराबाहेर पडाल तर फसाल, या मार्गावर 30 दिवसांचा मेगाब्लॉक











