Weather Alert: बुधवारी बर्फासारखी थंडी, पुणे-मुंबईचा पारा घसरला, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पुणे-मुंबईसह बहुतांश भागात गारठा वाढला असून 24 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
राज्यातील हवामानात सतत बदल पाहायला मिळत आहेत. डिसेंबरमध्ये काही भागांत थंडी वाढताना दिसत असली, तरी काही ठिकाणी तापमानात हलके चढउतार जाणवत आहेत. मागील काही दिवसांत पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात गारठा ठळकपणे जाणवला असून, आता मुंबईतही किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. 24 डिसेंबर रोजीही राज्याच्या अनेक भागांत थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंडावा अधिक जाणवेल. किमान तापमानात सुमारे 1 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज असून, किमान तापमान सुमारे 17 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. त्यामुळे मुंबईकरांना सकाळ-संध्याकाळी थंडीचा अनुभव येईल.
advertisement
advertisement
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात काही दिवस ढगाळ वातावरणामुळे थंडी थोडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा थंडावा वाढण्याची चिन्हे आहेत. मराठवाड्यात किमान तापमान 9 ते 11 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातही गारठा कायम असून नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुढील काही दिवस विदर्भात थंडीची लाट कायम राहील.
advertisement
सध्या संपूर्ण राज्यात थंडीचा प्रभाव जाणवत असून तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. काही भागांत किमान तापमान लक्षणीयरीत्या घसरले असून सकाळी आणि रात्री गारठा अधिक जाणवतो, तर दुपारच्या वेळी ऊन असल्याने थोडा दिलासा मिळतो. ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.









