advertisement

Mumbai Traffic : मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका! बीएमसी अ‍ॅक्शन मोडमध्ये,6 उड्डाणपूल कधीपासून होणार सुरू?

Last Updated:

Mumbai New Bridges : मुंबई शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होणार आहे. नेमके यामागील कारण काय आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पावसाळ्यापर्यंत तीन पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईतील तीन पूल सुरू करणार
पावसाळ्यापर्यंत तीन पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईतील तीन पूल सुरू करणार
मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने मोठा प्लॅन आखला असून येत्या पावसाळ्यापर्यंत शहरातील काही महत्त्वाचे पूल सुरु होणार आहेत. विशेषतहा पूर्व उपनगर तसेच दक्षिण मुंबईतील असे एकूण सहा पूल सुरु करण्याचा प्रयत्न आहे.
नेमके कोणते असतील ते पूल?
1)विद्याविहारमधील उड्डाणपूल 25 जूनपर्यंत वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच रामकृष्ण चेंबूरकर या मार्गाला जोडणार असल्यामुळे पूर्व आणि पश्चिम वाहतूक सोपी होणार आहे, त्यामुळे प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना मोठा फायदा होईल.
2) सायन रेल्वे स्थानकाजवळील पूलाचा यात समावेश असून 15 जुलैपर्यंत या पुलाचे काम करण्याचे लक्ष्य आहे. हा पूल सुरु झाल्यास मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणार असून महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
advertisement
3) गोरेगाव ते दिंडोशी दरम्यानचा पूल हा पुढच्या महिन्यांच्या शेवटापर्यंत म्हणजे 31 मेपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा पूल गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा भाग असून वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी हा पुल फायदेशीर ठरणार आहे.
४) शिवाय महालक्ष्मी येथील केबल स्टेड पूल हा दिवाळीपर्यंत खुला करण्याचा प्रयत्न आहे तर नेहरु तारांगण ते एनी बेझंड रोड जोडणारा पूल सुरु झाल्यास वरळीतील होणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होईल. पुढील सहा महिन्यांत एकूण सात पूल सुरू करून मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic : मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका! बीएमसी अ‍ॅक्शन मोडमध्ये,6 उड्डाणपूल कधीपासून होणार सुरू?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement