advertisement

मुलांकडे लक्ष द्या! झोका खेळताना चिमुकलीसोबत भयंकर घडलं, आईनं पाहिलं तर..., अख्खं गाव हळहळलं!

Last Updated:

Beed News: बराच वेळ झाल्यानंतरही वृंदा खाली आली नाही, त्यामुळे तिच्या आईला संशय आला. ती वर पाहण्यासाठी गेली असता...

मुलांकडे लक्ष द्या! झोका खेळताना चिमुकलीसोबत भयंकर घडलं, आईनं पाहिलं तर...., अख्खं गाव हळहळलं!
मुलांकडे लक्ष द्या! झोका खेळताना चिमुकलीसोबत भयंकर घडलं, आईनं पाहिलं तर...., अख्खं गाव हळहळलं!
बीड: बीडमधील माजलगाव शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. झोका खेळताना झालेल्या अपघातात नऊ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. वृंदा समीर रुद्रवार असे मृत मुलीचे नाव असून ती अत्यंत निरागस आणि खेळकर स्वभावाची होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडोबा मैदान परिसरात राहणाऱ्या रुद्रवार कुटुंबाच्या घरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वृंदा आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर खेळण्यासाठी गेली होती. घरात लावलेल्या झुल्यावर ती खेळत असताना अचानक तिचा तोल गेला.
advertisement
झोक्यावर चढताना किंवा उतरताना तिच्या गळ्याभोवती झोक्याची दोरी अडकली आणि त्यातूनच गळफास बसल्याचे समजते. त्याच वेळी तिच्या पायाखालील आधार निसटल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. काही क्षणांतच ही खेळाची वेळ दुर्दैवी अपघातात बदलली.
दरम्यान, बराच वेळ झाल्यानंतरही वृंदा खाली आली नाही, त्यामुळे तिच्या आईला संशय आला. ती वर पाहण्यासाठी गेली असता तिला मुलगी अडकलेल्या अवस्थेत दिसून आली. हे दृश्य पाहताच आईने हंबरडा फोडला. तिच्या आवाजाने घरातील इतर सदस्य वर धावले आणि त्यांनी तातडीने वृंदाला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
advertisement
या घटनेमुळे माजलगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील साध्या खेळण्यांमधूनही गंभीर अपघात घडू शकतात, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
मुलांकडे लक्ष द्या! झोका खेळताना चिमुकलीसोबत भयंकर घडलं, आईनं पाहिलं तर..., अख्खं गाव हळहळलं!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement