Mumbai Rain : मुंबईत पावसाचं थैमान, शहरातील 'या' शाळांना सुट्टी जाहीर, IMD कडून 48 तासांसाठी रेड अलर्ट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Rain Holiday declared In school : दुपारी असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबई पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.
Mumbai IMD Red Alert : भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आयएमडीकडून येत्या 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुपारी असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर
आठवड्याचा पहिलाच दिवस आणि मुंबईला पावसाने झोडपलं पहायला मिळतंय. आता मुंबईमध्ये सकाळी जे विद्यार्थी शाळेत आले आहेत त्यांच्या सुखरूप घरी पोहचण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच दुपारी असणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबई पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.
advertisement
भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज (दिनांक १८ ऑगस्ट २०२५) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2025
advertisement
...तरच घराबाहेर पडा
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे.
18 Aug,Red alert for possibility heavy🟡 to very heavy🟠with extremely heavy🔴rainfall at isol places is issued by IMD for next two days for #konkan including #Mumbai #Thane & also for Ghat areas of #M_Mah. Orange alerts r also for parts of #Marathwada & #Vidarbha. TC@RMC_Mumbai pic.twitter.com/kEo4mDcO4v
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 18, 2025
advertisement
मुंबईची तुंबई
दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं पहायला मिळतंय. सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका थेट आता मध्य रेल्वे ला बसलेला पाहायला मिळतोय घाटकोपर कुर्ला सायन भागामध्ये मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे.. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली असून ठाण्याहून सीएसएमटी तसेच कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Rain : मुंबईत पावसाचं थैमान, शहरातील 'या' शाळांना सुट्टी जाहीर, IMD कडून 48 तासांसाठी रेड अलर्ट!