Mumbai News : मुंबईच्या शिवडीत एकामागून एक 4 सिलेंडरचे स्फोट, चाळीला आग-धुरांचे लोट, नेमकं काय घडलं?

Last Updated:

मुंबईत महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाची लगबग सूरू असताना तिकडे वडाळ्यातील शिवडीमध्ये सिलेंडरचे एकामागून एक 4 स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत ही स्फोटाची घटना घडली आहे.

Mumbai News : मुंबईत महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाची लगबग सूरू असताना तिकडे वडाळ्यातील शिवडीमध्ये सिलेंडरचे एकामागून एक 4 स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत ही स्फोटाची घटना घडली आहे. ही घटना इतकी भयानक होती चाळीतील 5-6 घरे जळुन खाक झाले आहे.या घटनेत जिवितहानी झाल्याची अद्याप तरी कोणतीही माहिता समोर आली नाही आहे. पण या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत ही आज दुपारी 3.15 वाजता घटना घडली आहे. या घटनेत सूरूवातीला एका चाळीतील घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. ही आग पुढे पुढे पसरत गेली आणि
एका घरात असलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.त्यानंतर आजूबाजूच्या घरात असलेल्या 3 सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.एकूण ४ सिलिंडरच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
advertisement
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलासोबतच शिवडी पोलीस, पालिकेचा वॉर्ड स्टाफ आणि बेस्टचे कर्मचारीही तातडीने मदतीसाठी पोहोचले आहेत.तसेच या घटनेनंतर बरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सुदैवाने या भीषण स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाने परिसराची नाकेबंदी केली असून बचावकार्य सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईच्या शिवडीत एकामागून एक 4 सिलेंडरचे स्फोट, चाळीला आग-धुरांचे लोट, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement