advertisement

Mumbai Crime : ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळली, त्याच पित्याने विश्वासघात केला; मनोरुग्ण मुलीवर घरातच क्रूर कृत्य

Last Updated:

Mumbai Crime : मुंबई शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे. जिथे घरातच असलेल्या मुलीसोबत केलेल्या कृत्याने सर्वजण हादरले आहेत.

Deaf and Intellectually Disabled Woman’s Medical Emergency Exposes Heinous Crime at Home
Deaf and Intellectually Disabled Woman’s Medical Emergency Exposes Heinous Crime at Home
मुंबई : मुंबईतील एका परिसरात घडलेली घटना प्रत्येकाला हादरवणारी आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी असलेली एक मूकबधिर आणि मतिमंद तरुणी तिच्याच घरात सुरक्षित नव्हती. बोलता न येणं आणि परिस्थिती समजून न घेण्याची अवस्था याचाच गैरफायदा घेत तिच्या वडिलांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोटदुखीच्या तक्रारीने उघड झाला भयंकर प्रकार
ही तरुणी काही दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त होती.त्यामुळे तिने आपल्या आजीकडे वारंवार पोट दुखत असल्याचे सांगितले आणि तातडीने मुंबईतील कामा आणि एल्बल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांना धक्का बसला कारण ती तरुणी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले
नराधम पित्याचे संतापजनक कृत्य उघड
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या पथकाने आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि डीएनए चाचणी केली. या चाचणीतून गर्भातील बाळाचे वडील पीडितेचे वडीलच असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
तपास अधिक खोलात गेल्यानंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणाशी संबंधित एकूण 17 आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून हे आरोपी अशाच असहाय्य मुलींवर वारंवार अत्याचार करत होते. यामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.सध्या पोलिसांनी प्रमुख आरोपीसह इतर संशयितांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळली, त्याच पित्याने विश्वासघात केला; मनोरुग्ण मुलीवर घरातच क्रूर कृत्य
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement