BDD Chawl Building : बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठी गुड न्यूज! 864 घरांचा ताबा केव्हा मिळणार?

Last Updated:

BDD Chawl Redevelopment Building : नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पाच पुनर्वसित इमारतींमधील 864 घरांचा ताबा लवकरच दिला जाणार आहे.

News18
News18
नायगाव (Naigaon) येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पाच पुनर्वसित इमारतींमधील 864 घरांचा ताबा लवकरच दिला जाणार असून, यासाठी महाराष्ट्र अग्निशमन दल (Fire Brigade) यांच्याकडून 'ना-हरकत' प्रमाणपत्र (NOC) मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवाळीपर्यंत घरं मिळण्याची आशा या प्रकल्पामुळे या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या 864 घरांच्या असलेल्या पाच इमारतींना 'ना-हरकत'प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सर्व रहिवाशांना निवासी दाखला (ओसी) घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून या घरांचा ताबा येत्या 15 दिवसांत देण्याचे मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी ही एक प्रकारची आनंदाची बातमी म्हणता येईल.
नायगावच्या बीडीडी चाळीतील रहिवाशांना स्वत:च्या मालकीचं 500 चौरस फुटांचे घराचे स्वप्न दिवाळीदरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील चाळीतील अनेक रहिवाशांना पहिल्या टप्प्यात इमारतीमध्ये पुनर्वसित केले जात आहे. वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींतील 556 रहिवाशांना घराचा ताबा देण्यात आला आहे. तर नायगावमध्ये पहिल्या टप्प्यात आठ पुनर्वसित इमारतींचे, तर दुसऱ्या टप्प्यातील आणखी तीन इमारतींचे काम सुरू आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 864 घरांचा समावेश असलेल्या पाच पुनर्वसित इमारतींचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच आता घरांचा ताबा देण्याच्या दृष्टीने पुढील तयारीला मंडळ लागले आहे.x
advertisement
ऑनलाईन घर भाडं भरत असाल तर थांबा! ही बातमी खास तुमच्यासाठी; होणार मोठा बदल
नायगावमधील पाच इमारतींसाठी अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यासाठी मंडळाने अर्ज केला आहे. लवकरच आता मंडळाला अग्निशमन दलाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर 864 घरांसाठी निवासी दाखला घेण्यात येईल आणि येत्या 15 दिवसांमध्ये बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना इमारतीतील घराचा ताबा देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 864 घरांसाठी 23 मजली इमारतीतील 500 चौरस फुटांच्या घरात लवकरच बीडीडी चाळीतील रहिवाशी राहायला जाणार आहेत. बीडीडी चाळीतल्या रहिवाशांची दिवाळी यंदाची चांगलीच गोड होणार असून ते चांगलेच धुमधडाक्यात त्यांची दिवाळी साजरी करणार आहेत.
advertisement
दरम्यान, नायगाव बीडीडी चाळ ६.४५ हेक्टर जागेवर वसली असून त्यामध्ये एकूण ४२ चाळी आहेत. या ४२ चाळींमध्ये एकूण ३,३४४ घरे आहेत. या ४२ चाळींच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजली २० पुनर्वसित इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील आठ इमारतींपैकी पाच इमारतींचे काम पूर्ण झाले आहे आणि आता लवकरच या इमारतींच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करून घरांचा ताबा देण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BDD Chawl Building : बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठी गुड न्यूज! 864 घरांचा ताबा केव्हा मिळणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement