Solapur News : नवरात्रनिमित्त सोलापूर शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

Solapur Navratri 2025 : सोलापूर शहरामध्ये नवरात्रीनिमित्त काही मंडळाकडून मिरवणूक देखील काढण्यात येते. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे.

Solapur News : नवरात्रनिमित्त सोलापूर शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?
Solapur News : नवरात्रनिमित्त सोलापूर शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?
सोलापूर - नवरात्र उत्सवाला सोमवार 22 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार असून त्याच दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सोलापूर शहरात नवरात्र उत्सवात काही मंडळाकडून मिरवणूक देखील काढण्यात येते. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त 22 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर रोजी शहरातून शक्ती देवीची मिरवणूक काढली जाते. तर काही मंडळाची मिरवणूक राष्ट्रीय महामार्गावरून निघते. तसेच बाळवेस चौक, टिळक चौक, मधला मारुतीचौक, कोतम चौक, माणिक चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकी या परिसरात साहित्य खरेदी करण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुक कोंडीची शक्यता असल्याने 22 सप्टेंबर सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक 2 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
नवरात्र उत्सवानिमित्त बाळवेस चौक, टिळक चौक, मधला मारुतीचौक, कोतम चौक, माणिक चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकी परिसरात पूजेसाठी तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी असते म्हणून 22 सप्टेंबर सकाळी सहा वाजल्यापासून ते दोन ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.तसेच पोलीस खात्याची वाहने अत्यावश्यक सेवेची व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील त्याच वाहनांना या मार्गावरून वाहने नेण्यास परवानगी असणार आहे.बाळीवेस ,बीएसएनएल ऑफिस, मंगळवार पेठ पोलीस चौकी ते कुंभार बेस्ट मार्गे कोणतं चौक व पुढे समाचार चौक मार्गे माणिक चौक हा पर्यायी मार्ग असेल.आदेशाचा भंग केल्यास त्या व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वय गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur News : नवरात्रनिमित्त सोलापूर शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement