नमो ॲप अभियान: महाराष्ट्रात 1 कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य
- Published by:Ramesh Patil
- Written by:Tushar Rupanwar
Last Updated:
Maharashtra Bjp: भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चहल यांनी विकसित भारत अँबेसेडर अभियानाची माहिती दिली.
मुंबई, 31 डिसेंबर : राज्यभरात प्रदेश भाजपतर्फे कोटी पेक्षा अधिक विकसित भारत अँबेसेडर बनविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपच्या नमो ॲप अभियानाचे राष्ट्रीय संयोजक कुलजीत सिंग चहल यांनी शनिवारी दिली. भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चहल यांनी विकसित भारत अँबेसेडर अभियानाची माहिती दिली. यावेळी भाजप प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व विकसित भारत ब्रँड अँबेसेडर अभियान प्रदेश संयोजक नवनाथ बन आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.
श्री. चहल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत संकल्पासोबत हे विकसित भारत ब्रँड अँबेसेडर जोडले जातील. मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे अँबेसेडर करणार आहेत.
भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता असे कमीत-कमी 10 अँबेसेडर बनवेल, असेही चहल यांनी नमूद केले. ज्या लाभार्थ्यांना मोदी सरकारच्या योजनांचा लाभ झाला, त्या सर्वानी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहनही चहल यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्रदेश भाजपकडून 1 कोटी विकसित भारत अँबेसेडर बनवण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार व्यक्त केल्याबद्दल चहल यांनी समाधान व्यक्त केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 31, 2023 1:10 PM IST