Navi Mumbai : नवी मुंबईतील हे स्टेशन हायटेक होणार! घणसोली, बेलापूरसह विमानतळला थेट जाता येणार, प्लॅन काय?
Last Updated:
Navi Mumbai News :खारकोपर रेल्वे स्थानक परिसरात बस डेपो नसल्याने प्रवासी आणि NMMT कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र सिडकोकडून पाहणी सुरू झाल्याने लवकरच या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था वेगाने बदलत आहे. अनेक रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास काम सुरू असून काही मार्गांवर नव्या लोकल गाड्याही सुरू झाल्या आहेत. मात्र नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचा विकास अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आणखी एका रेल्वे स्थानकाचा कायापालट
उलवेजवळील खारकोपर रेल्वे स्थानकात आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. स्थानक परिसरात बस थांबे असले तरी येथे अधिकृत बस डेपो नाही. त्यामुळे NMMT चे बस चालक आणि वाहकांना बसमधून उतरल्यावर रस्त्यावरच थांबावे लागते.
प्रवाशांचीही अवस्था फार वेगळी नाही. रेल्वेने उतरल्यावर बससाठी वाट पाहताना उन्हातान्हात उभं राहावं लागतं. पावसाळ्यात तर प्रवाशांना आजूबाजूच्या इमारतींच्या पोर्चमध्ये किंवा दुकानांच्या छपराखाली थांबावे लागते. याबाबत स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून नाराजी व्यक्त करत आहेत.
advertisement
मात्र आता या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. रविवार 11 जानेवारीपासून सिडकोच्या अधिकाऱ्यांनी खारकोपर रेल्वे स्थानकासमोरील जागेची पाहणी सुरू केली आहे. येथे बस डेपो उभारण्याच्या दृष्टीने जमीन उपलब्धता, वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम आणि भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेऊन सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.
विमानतळाशी थेट जोडले जाणार
खारकोपर आणि उल्वे परिसरातून NMMT बस सेवा नेरूळ, बेलापूर, घणसोली आणि नवी मुंबई विमानतळाला थेट जोडणी देतात. विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित बस डेपो आणि स्थानक विकासामुळे प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 10:57 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : नवी मुंबईतील हे स्टेशन हायटेक होणार! घणसोली, बेलापूरसह विमानतळला थेट जाता येणार, प्लॅन काय?








