Crime News : उसणे पैसे मागण्यासाठी गेली अन् 63 वर्षीय म्हाताऱ्याच्या तावडीत सापडली; विरारमध्ये संतापजनक प्रकार
Last Updated:
Virar News : विरारमध्ये पैसे उसने मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा 63 वर्षीय वृद्धाने विनयभंग केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
विरार : विरार पूर्व परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका निरागस अल्पवयीन मुलीचा एका 63 वर्षीय वृद्धाने विनयभंग केला. इतकेच नाही तर या संतापजनक प्रकारानंतर त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वृद्धाचा संतापजनक प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना १२ जानेवारी रोजी घडली. पीडित मुलगी घरगुती गरजेसाठी काही पैसे उसने मागण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली होती. पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असूनही आरोपीच्या मनात पाप आले. त्यावेळी दुकानात दुसरे कोणीही नसल्याची संधी साधून या 63 वर्षीय नराधमाने तिला जवळ बोलावले आणि तिचा विनयभंग केला.
advertisement
या भयानक प्रकारानंतर आरोपीने मुलीला काही पैसे दिले पण सोबतच एक अट घातली ''जर याबद्दल कोणाला काही सांगितले, तर तुला जीवे मारून टाकेन'' अशी धमकी त्याने त्या मुलीला दिली. या धमकीमुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र तिने हिंमत दाखवून हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने विरार पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
advertisement
पालकांच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने अशा प्रकारचे नीच कृत्य केल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या विरार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 12:29 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : उसणे पैसे मागण्यासाठी गेली अन् 63 वर्षीय म्हाताऱ्याच्या तावडीत सापडली; विरारमध्ये संतापजनक प्रकार







