What Is Kinkranti : संक्रांत आणि किंक्रातीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि महत्त्व..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Importance and significance of kinkrant : मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या काही दिवसांबाबत आपल्या परंपरेत खास श्रद्धा आणि संकेत दिलेले आहेत. त्यापैकीच एक दिवस म्हणजे किंक्रांत. अनेकांना हा दिवस माहिती असला तरी त्यामागील पौराणिक कथा, धार्मिक अर्थ आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या रूढी यांची सविस्तर माहिती फारशी ज्ञात नसते. किंक्रांत हा विजयाचा प्रतीक असला तरी त्याला एक वेगळं धार्मिक महत्त्वही आहे. चला जाणून घेऊया संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक आणि महत्त्व..
मकर संक्रांती हा सण आनंद, समृद्धी आणि शुभारंभाचं प्रतीक मानला जातो, तर त्यानंतर येणारा किंक्रांतचा दिवस थोडा वेगळा धार्मिक अर्थ घेऊन येतो. अनेकांना संक्रांती माहिती असते, मात्र किंक्रांत नेमकी काय आहे, ती का साजरी केली जाते आणि दोन्ही दिवसांमध्ये काय फरक आहे, याबद्दल अजूनही संभ्रम असतो. परंपरा, श्रद्धा आणि पौराणिक कथांवर आधारलेला हा फरक समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
advertisement
किंक्रांत म्हणजे काय : पौराणिक कथेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने ‘संक्रासूर’ नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मात्र त्यानंतरही ‘किंकर’ नावाचा एक भयानक राक्षस लोकांना छळत होता. संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी देवीने ‘देवी किंक्रांत’ हे रूप धारण करून किंकर राक्षसाचा संहार केला. या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘किंक्रांत’ म्हणून ओळखला जातो.
advertisement
advertisement
advertisement
बेसनाचे धिरडे आणि घरगुती संकेत : महाराष्ट्रात किंक्रांतीच्या दिवशी बेसनाचे धिरडे करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी केर काढण्यापूर्वी वेणी घालावी किंवा केस नीट विंचरावेत, असे सांगितले जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा केला जातो आणि किंक्रांत हा त्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो.
advertisement
किंक्रांतीच्या दिवशी काय टाळावे : या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन सुरुवात करू नये. लांबचा प्रवास टाळावा आणि घरात वादविवाद न करता मन शांत ठेवावे. केर काढण्यापूर्वी केस विंचरावेत, तसेच कुलदैवताची आणि देवाची पूजा करून नामस्मरण करावे. अशा प्रकारे संयम, श्रद्धा आणि शांततेने किंक्रांत साजरी केल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
advertisement







