हजारोंचा भुर्दंड बसण्याआधी आत्ताच सावध व्हा! गाडीवर HSRP प्लेट नसेल तर आधीच हे काम करून घ्या

Last Updated:

1 जानेवारी 2026 पासून ज्यांच्या वाहनावर HSRP नंबरप्लेट नसेल, त्यांच्यावर राज्यभरातील आरटीओ (RTO) आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

हजारोंचा भुर्दंड बसण्याआधी आत्ताच सावध व्हा! गाडीवर HSRP प्लेट नसेल तर आधीच हे काम करून घ्या
हजारोंचा भुर्दंड बसण्याआधी आत्ताच सावध व्हा! गाडीवर HSRP प्लेट नसेल तर आधीच हे काम करून घ्या
जर तुमच्याकडे सुद्धा वाहन असेल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही अजूनही HSRP नंबर प्लेट नसेल लावली तर लवकरात लवकर लावा. अन्यथा आरटीओ ऑफिसरकडून कारवाई करण्यात येईल. आरटीओ कार्यालयांकडून स्टायलिश असलेल्या नंबर प्लेटवर केली जात आहे, ज्यांच्या वाहनावर मराठी आकडे किंवा स्टायलिश आकडे असतील त्यांच्यावर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत होती, आता ती अंतिम मुदत संपली आहे.
1 जानेवारी 2026 पासून ज्यांच्या वाहनावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नंबरप्लेट नसेल, त्यांच्यावर राज्यभरातील आरटीओ (RTO) आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. ज्या वाहनांची 1 एप्रिल 2019 च्या आधी नोंदणी झालेली आहे, अशा वाहनांना HSRP नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले होते. सरकारने अनेकदा मुदतवाढ देऊनही लाखो वाहन धारकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता सरकारचे 'वेट अँड वॉच' धोरण संपले आहे. ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेतली नाही, त्यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात दंडाच्या दणक्याने होऊ शकते.
advertisement
जर तुम्ही अजूनही तुमच्या वाहनाला HSRP नंबरप्लेट लावली नसेल तर लवकरात लवकर लावून घ्या. अन्यथा तुम्हाला दंडाचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. जर पहिल्यांदाच तुम्हाला ट्रॅफिक हवालदरांनी पकडलं तर तुम्हाला 1,000 रूपये इतका दंड आकारला जाईल. जर तुम्ही नियमाचे उल्लंघन सुरूच ठेवले आणि दुसऱ्यांदा पकडलं तर, तुम्हाला 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. शिवाय, तुमच्या गाडीला HSRP नंबरप्लेट नसेल तर मालकी हस्तांतरण, पासिंग किंवा फिटनेस प्रमाणपत्र सारखे RTO चे महत्त्वाचे कामं करता येणार नाहीत. HSRP नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला अनेक महत्त्वाचे काम करता येणार नाहीत.
advertisement
HSRP नंबरप्लेट काढण्याची शेवटची तारीख जरीही निघून गेली असली तरीही तुम्ही घाबरू नका. मात्र, आळस केलात तर तो तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. transport.maharashtra.gov.in या महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या वाहनाचा तपशील भरून ऑनलाइन फी भरा आणि 'फिटमेंट'साठी अपॉइंटमेंट बुक करा. जर तुमच्याकडे अधिकृत अपॉइंटमेंटची पावती असेल, तर पोलीस तुमच्यावर कारवाई करणार नाहीत. HSRP नंबरप्लेटचे अनेक फायदे आहेत. जसे की, जर तुमचं वाहन चोरीला गेलं तर त्याचा शोध घेणं सोप्प होईल. 'लेझर कोड'च्या मदतीने पोलिस तुमचं हरवलेलं वाहन तुम्हाला शोधून देतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
हजारोंचा भुर्दंड बसण्याआधी आत्ताच सावध व्हा! गाडीवर HSRP प्लेट नसेल तर आधीच हे काम करून घ्या
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement