बायकोच्या माहेरी गेलेल्या आशिष विद्यार्थी यांना दुचाकीने उडवलं, अपघातानंतरचा पहिला VIDEO समोर; सांगितलं नेमकं काय घडलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ashish Vidyarthi Accident Health Update : अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर आशिष विद्यार्थी यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. आशिष विद्यार्थी यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांची हेल्थ अपडेट दिली.
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. गुवाहटीमध्ये रस्ता क्रॉस करताना आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली गरूआ यांना एका दुचास्कीस्वाराने धकड दिली. या अपघतात आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी जखमी झाले. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती समोर आल्यानंतर आशिष विद्यार्थी यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची प्रकृती आता कशी आहे याबाबत सगळ्यांना चिंता लागून होती. अखेर आशिष विद्यार्थी यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांचा अपघात कसा झाला? त्यांची आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती आता कशी आहे याबाबत अपडेट दिली.
आशिष विद्यार्थी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं, "मी खूप न्यूज चॅनल्समध्ये पाहिलं. मी आणि रुपाली रस्ता क्रॉस करताना आम्हाला बाईकने धडक दिली. आम्ही दोघे ठीक आहोत."
"रुपाली अंडर ऑब्जरवेशनमध्ये आहे. सगळं काही ठीक आहे. मी ठीक आहे. छोटीशी जखम झाली आहे. पण तीही बरी होईल. मी बोलतोय, चालतोय सगळं काही करू शकतोय. मला तुम्हाला फक्त हेच सांगायचं आहे की हो असं झालं आहे. पण आम्ही ठीक आहोत काळजी करण्याचं कारण नाही."
advertisement
आशिष विद्यार्थी पुढे म्हणाले, "मी पोलिसांना त्या दुचाकी स्वाराविषयीही विचारलं. त्यालाही आता शुद्ध आली आहे. सगळ्यांचं चांगलं होवो, सगळे ठीक राहोत. सगळ्यांचे आभार. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून आम्ही ठीक आहोत हे सगळ्यांना कळेल. तुमचे शुभाशीर्वाद माझ्या आणि रुपालीच्या सोबत आहेत. आमचं कुटुंब आणि नातेवाईक आमच्यासोबत आहेत. अपोलो हॉस्पिटलचा इमरजन्स स्टॉफकडून आमची खूप चांगली काळजी घेतली जात आहे."
advertisement
advertisement
आशिष विद्यार्थी यांची पत्नी रुपाली या आसामच्या गुवाहटीमधील आहेत. ते पत्नीसह गुवाहटीमध्ये होते तेव्हा हा अपघात झाला. आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीला ज्या दुचाकीस्वाराने धडक दिली ते देखील जखमी झाला आहे. त्याला शुद्ध आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आशिष यांच्या पायाला मार लागला आहे तर त्यांच्या पत्नीच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्या पत्नीचे दोन MIR करण्यात आले असून डॉक्टरांनी काळजीचं कारण नसल्याचं सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 3:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बायकोच्या माहेरी गेलेल्या आशिष विद्यार्थी यांना दुचाकीने उडवलं, अपघातानंतरचा पहिला VIDEO समोर; सांगितलं नेमकं काय घडलं











