Thane : वाहतुकीत मोठा बदल! म्हश्याच्या यात्रेला जाणार आहात? त्याआधी ही बातमी वाचाच

Last Updated:

Murbad jatra 2026 : मुरबाड येथील प्रसिद्ध म्हश्याच्या यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

News18
News18
ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील खाम्बलिंगेश्वर देवस्थान परिसरात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने भरवली जाणारी प्रसिद्ध जत्रा यंदाही मोठ्या उत्साहात आजपासून सुरू होत आहे. या जत्रेला राज्यभरातून लाखो भाविक, यात्रेकरू, शेतकरी, व्यापारी तसेच पशु मालक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने यंदा विशेष वाहतूक व्यवस्थापन राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
जाणून घ्या वाहतूक बदल
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावानुसार जत्राकाळात काही प्रमुख मार्गांवर वाहनांना थेट प्रवेश दिला जाणार नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून हे बदल 17 जानेवारी 2026 रोजी रात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. जत्रेदरम्यान ठाणे जिल्ह्यासह रायगड, पुणे, नाशिक, मुंबई, पालघर आणि कोकणातील विविध भागांतून सुमारे 17 ते 18 लाख भाविक मुरबाडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
advertisement
या काळात मुरबाड शहर, बाजारपेठ, एसटी स्थानक, मुख्य चौक आणि जोडरस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढते. जत्रेच्या निमित्ताने बैल बाजारासह गुरांची खरेदी-विक्री, तात्पुरत्या बाजारपेठा आणि विविध वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांकडून तपासणी नाके, बॅरिकेडिंग आणि दिशादर्शक फलक उभारण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस पथके व वाहतूक शाखेचा विशेष बंदोबस्तही तैनात राहणार आहे.
advertisement
जड-अवजड वाहनांसाठी मुरबाड-म्हसा-कर्जत मार्गावर निर्बंध घालण्यात आले असून त्यांना पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. मात्र रुग्णवाहिका, शासकीय आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : वाहतुकीत मोठा बदल! म्हश्याच्या यात्रेला जाणार आहात? त्याआधी ही बातमी वाचाच
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement