फक्त 99 रुपयांपासून चायनीज कॉम्बो, मुंबईत खवय्येगिरींसाठी खास पर्वणी; कॅफे कुठे आहे?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
दादर-माटुंगा रोड परिसरातील रुपारेल कॉलेजच्या समोर असलेल्या मुंबई वाइब कॅफे मध्ये चायनीज कॉम्बो अगदी 99 रुपयांपासून मिळत आहेत. कॅफेची खासीयत म्हणजे वेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही प्रकारांमध्ये चायनीज पदार्थ उपलब्ध आहेत.
दादर- माटुंगा रोड परिसरातील रुपारेल कॉलेजच्या समोर असलेल्या ‘मुंबई वाइब कॅफे’मध्ये चायनीज कॉम्बो अगदी 99 रुपयांपासून मिळत आहेत. कॅफेची खासियत म्हणजे वेज आणि नॉन- व्हेज अशा दोन्ही प्रकारांमध्ये चायनीज पदार्थ उपलब्ध आहेत. ‘मुंबई वाइब कॅफे’चे 99 रुपयांच्या चायनीज कॉम्बोमध्ये फ्राईड राइस किंवा नूडल्ससोबत घरगुती शेजवान चटणी आणि सॉसेस दिले जात आहेत. या कॉम्बोची किंमत आणि चव दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी परवडणारी असल्याने हा पर्याय अत्यंत लोकप्रिय ठरला आहे.
याशिवाय 129 रुपयांच्या कॉम्बोमध्ये शेजवान राइस किंवा नूडल्स आणि चिली ड्राय मिळत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चवीचा अनुभव घेता येतो. नॉन- व्हेज प्रेमींसाठी कॅफेमध्ये 289 रुपयांचा एक मोठा कॉम्बो दिला जात आहे ज्यात चिकन फ्राईड राईस, शेजवान चटणी, चिकन चिली ड्राय, चिकन मंचुरियन ग्रेवी आणि चिकन क्रिस्पी यांचा समावेश आहे. याशिवाय वेज फ्राईड राईस / नूडल्स + वेज मंचुरियन ड्राय 139 रुपयांत उपलब्ध आहे. ह्यात नॉनव्हेज देखील उपलब्ध आहे.
advertisement
विशेष म्हणजे कॅफेमध्ये 8 ते 10 विविध प्रकारचे चायनीज कॉम्बो उपलब्ध आहेत ज्यांची किंमत 99 रुपयांपासून 289 रुपयांपर्यंत आहे. कॉलेज समोरील लोकेशन आणि किफायतशीर किंमतींमुळे कॅफे आता तरुणांची आवड बनले आहे. सोयीस्कर लोकेशन आणि चवदार परवडणारे जेवण यामुळे ‘मुंबई वाइब कॅफे’ने दादर- माटुंगा परिसरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी कॉलेजच्या समोर असल्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेक खवय्येगिरींची एकच गर्दी होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
फक्त 99 रुपयांपासून चायनीज कॉम्बो, मुंबईत खवय्येगिरींसाठी खास पर्वणी; कॅफे कुठे आहे?

