advertisement

Shocking News : तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली अन् तिथेच घात झाला; 63 वर्षीय व्यक्ती भयंकर जाळ्यात अडकले

Last Updated:

Panvel Railway Station : पनवेल रेल्वे स्थानकातील भुयारी मार्ग पुन्हा सुरू झाला असून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

News18
News18
पनवेल : ट्रेंडिंग नावाचा फसवणूक प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी एका अनोळखी इसमाविरोधात 14 लाख दहा हजार रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. 63 वर्षीय जेष्ठ नागरिक तेजेंद्रनाथ गर्ग हे कामोठे येथे राहत आहेत. फेसबुकवर त्यांना एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्यांनी ती स्वीकारली.
नेमकं घडलं काय?
या महिलेने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्हाट्सअप नंबर दिला. तिने सांगितले की तिच्या अॅपमध्ये गुंतवणूक केल्यास रोज पाच टक्के नफा मिळेल. तेजेंद्रनाथ यांनी तिच्या लिंकवर क्लिक करून अकाउंट उघडले आणि सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. नंतर त्यांनी विश्वास ठेवून आणखी पैसे जमा केले.
परंतु नंतर त्यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तरी अॅपने पैसे काढण्याची परवानगी दिली नाही. अशा प्रकारे या फसवणुकीतून तेजेंद्रनाथ यांचा तब्बल 14 लाख 10 हजार रुपये बुडाले. कामोठे पोलिस आता तपास करत आहेत. पोलीस नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहेत आणि ऑनलाइन गुंतवणूक करताना खात्रीशीर स्रोत वापरण्याचा सल्ला देत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली अन् तिथेच घात झाला; 63 वर्षीय व्यक्ती भयंकर जाळ्यात अडकले
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement