…मग तेव्हा का माफी मागितली नाही? संजय राऊतांचा PM मोदींना खोचक सवाल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maharashtra Political News: माफी मागून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाका, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिला. मोदी यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे. या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता.
मुंबई : नतमस्तक होऊन शिवरायांची माफी मागतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनेबाबत माफी मागितली. वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात त्यांनी या भावना व्यक्त केल्या यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली.
भारतीय जनता पक्षाचे किंवा मिंदे गटाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले. वाढवण बंदराच्या संदर्भात भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता, तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांचा निषेध केला. मोदी गो बॅक, मोदी परत जा, अशा घोषणा दिल्या. मोदींनी पाहिलं असेल की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीने कोसळला आणि संतापाच्या लावा इथे महाराष्ट्रात उसळल्या, त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातल्या संतापाला तोंड द्यावे लागेल. त्याच्यामुळे काल त्यांनी ही राजकीय माफी मागितली.
advertisement
पंतप्रधान मोदी यांची ही माफी राजकीय माफी आहे. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी, याच्यामध्ये फार मोठे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम, महाराष्ट्राच्या विषयी प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही.
माफी मागून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाका, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिला. मोदी यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे. या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही, ज्या प्रकारचा घोर आपमन छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात झाला, या सरकारकडून झाला आहे. मोदींनी निर्माण केलेल्या हे सरकार संकष्ट आहे. मोदींनी त्यांचं काम केलं, महाराष्ट्र महाराष्ट्राचे काम करेल.
advertisement
मोदींनी जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात सरकारला जोडे मारो आंदोलनाचा कार्यक्रम आहे. त्यात कोणताही बदल नाही. उद्या अकरा वाजता सन्माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतली सर्व घटक पक्ष लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील.
advertisement
प्रधानमंत्री यांना जर खरोखर अशा घटनांचे गांभीर्य असेल दुःख असेल तर पाच वर्षांपूर्वी पुलवामामध्ये आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असती. जम्मू कश्मीरमध्ये आजही काश्मिरी पंडितांवर अत्याचार होतो, त्याबद्दल माफी मागितली असती. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, त्याबद्दल माफी मागितली असती. पण, प्रत्येक वेळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, तशी पावलं टाकायची ही आमच्या पंतप्रधानांची खासियत आहे. छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा राजकीय विषय आहे. माफी मागितली नाही तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेले नाही हे तुम्हाला कळेल.
advertisement
या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी भूमिका बजावलेली आहे. शिवरायांच्या अपमानात त्याचा तपास कोण करणार आरोपींना अटक कोण करणार शिल्पकाराला ती सुपारी कोणी दिली, काही कोटींची होती, त्यांची नावे कधी समोर येणार? सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केलं आहे, त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? पुतळ्यामागे जे ठाणे कनेक्शन आहे, त्या ठाणे कनेक्शनच्या सूत्रधाराचा वर्षा बंगल्यावर राजीनामा कोण घेणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2024 2:18 PM IST


