PM Modi : G20 च्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला महत्त्वाचा मुद्दा, मनी कंट्रोल डॉट कॉमवर सर्वात मोठी मुलाखत
- Published by:sachin Salve
Last Updated:
PM Narendra Modi Interview G20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीकंट्रोल डॉट कॉमला विशेष मुलाखतीत दिली आहे, बुधवारी सकाळी 7.30 वाजता ही मुलाखत पाहता येईल.
मुंबई, 05 सप्टेंबर : भारत आता विकसनशील देशाचं हित आता पुढे करत आहे. ज्यामध्ये ते देश सुद्धा सामील आहे, ज्यांचं G20 मध्ये प्रतिनिधित्व नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीकंट्रोल डॉट कॉमला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत व्यक्त केलं आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता ही मुलाखत प्रसारित होणार आहे.
G20 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासाबद्दल अनेक मुद्दांवर भाष्य केलं.
'आफ्रिकन युनियनच्या देशांसारख्या G20 मध्ये प्रतिनिधित्व नसलेल्या देशांच्या हितांसह भारत विकसनशील जगाच्या हितासाठी प्रगती करत आहे. G20 च्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच, ट्रोइका विकसनशील देशांसोबत आहे, इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील. जेव्हा जागतिक भू-राजनीतीमुळे तणाव वाढलेला असतो तेव्हा निर्णायक वेळी ही ट्रॉइका विकसनशील जगाचा आवाज वाढवू शकते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
advertisement
मागील 9 वर्षांमध्ये आम्ही आपल्या देशासाठी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या दृष्टीकोनातून काम केलं आहे. जागतिक स्तरावर संबंध राखण्यासाठी हेच आमचे तत्त्व असणार आहे. जेव्हा आम्ही G20 साठी आमचा अजेंडा मांडला तेव्हा सगळीकडे स्वागत झालं आहे. कारण प्रत्येकाला माहिती होतं की, आम्ही जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आमचे सक्रिय आणि सकारात्मक दृष्टीकोन आहे' असंही पंतप्रधान म्हणाले.
advertisement
ज्यावेळी मला इतर देशातील नेते भेटतात, तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल बोलतात, 140 कोटी भारतीयांच्या प्रयत्नांमुळे ते भाजताबद्दल आशावादी आहे. त्यांना खात्री आहे की, भारताकडे देण्यासारखं बरंच काही आहे आणि जागतिक स्तरावर भविष्य घडवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली पाहिजे, G20 प्लॅटफॉर्मद्वारे आमच्या कार्यासाठी त्यांच्या समर्थनात देखील हे दिसून आले आहे' असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत बुधवारी सकाळी 7:30 वाजता www.moneycontrol.com वर पाहू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 05, 2023 5:36 PM IST
मराठी बातम्या/देश/
PM Modi : G20 च्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला महत्त्वाचा मुद्दा, मनी कंट्रोल डॉट कॉमवर सर्वात मोठी मुलाखत










