मुंबईच्या दादर स्टेशनवर मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरताना दिसली व्यक्ती; झडती घेताच RPF जवानांचाही उडाला थरकाप!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दादर रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई, दिवाकर सिंग, प्रतिनिधी : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एका बॅगेमध्ये मृतदेह आढळून आला आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरत होता, त्याच्यावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना संशय आला, म्हणून त्यांनी त्याची झडती घेतली. बॅग उघडताच जवानांना धक्काच बसला. या बॅगमध्ये रक्तानं माखलेला एक मृतदेह आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरत असल्याचं गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना दिसलं. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यामुळे आरपीएफकडून त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची झडती घेण्यात आली, बॅग उघडताच जवानांना धक्का बसला. या बॅगेमध्ये रक्तानं माखलेला एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह अरशद अली सादिक अली शेख नावाच्या व्यक्तीचा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
advertisement
ही हत्येची घटना मुंबईच्या पायधुनी परिसरातील असल्यानं हे प्रकरण पायधुनी पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. दादरला ही बॅग घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीचं नाव जय चावडा असं आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे, तर या प्रकरणात चावडाचा मित्र शिवजीत सिंह याचं देखील नाव समोर आलं आहे, त्याने या हत्येसाठी चावडाला मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्याला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेलं शस्त्र देखील जप्त केलं असून, ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2024 8:09 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईच्या दादर स्टेशनवर मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन फिरताना दिसली व्यक्ती; झडती घेताच RPF जवानांचाही उडाला थरकाप!