Aaditya Thackeray : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? पहिला फोन कॉल कुणी केला? आदित्य ठाकरेंनी सांगितली युतीची इनसाईड स्टोरी!

Last Updated:

Aaditya Thackeray On MNS UBT Yuti : एका मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिली टाळी कुणी दिली? यावर खुलासा केला आहे. पहिला फोन कुणी कुणाला केला होता? यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.

Aaditya Thackeray On MNS UBT Yuti
Aaditya Thackeray On MNS UBT Yuti
Aaditya Thackeray On MNS UBT Yuti : आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेची चुरस आणखी वाढल्याचं चित्र पहायला मिळतंय. राजपुत्र अमित ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा सांभाळीये. अशातच आता एका मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिली टाळी कुणी दिली? यावर खुलासा केला आहे. पहिला फोन कुणी कुणाला केला होता? यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.

आमच्यामध्ये 20 वर्षाचं अंतर पण...

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिला फोन कॉल कुणी कोणाला केला? असा सवाल विचारल्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आमच्यात एवढ्या चर्चा आणि बैठका झाल्या. त्यामुळे मागील सर्व इतकं ब्लर झालंय की, पहिला फोन कुणी केला हे आम्हाला आठवत देखील नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमच्यामध्ये एवढं 20 वर्षाचं अंतर होतं हे आम्हाला आता जाणवत देखील नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
advertisement

एवढं नॅचरली फोन कॉल झाले की...

आम्हा दोघांमध्ये एवढं नॅचरली फोन कॉल झाले की, आम्हाला आठवत देखील नाही की पहिला फोन कॉल कुणी कोणाला केला होता, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल दिली. राजसाहेबांचा महेश मांजरेकर यांच्यासोबतच जो पॉडकास्ट होता, ज्यात ते म्हणाले होते की महाराष्ट्रासाठी आम्ही छोटेमोठे वाद बाजूला ठेवायला तयार आहोत. त्यानंतर संजय राऊतांनी त्यांची मत व्यक्त केलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय.
advertisement

जास्त खेचातान करू नका

दरम्यान, दोन पक्ष विचार आहे. त्यामुळे दोन वेगवेगळे विचार आहेत. पण या मुद्दयावर आम्ही एकत्र आलो. जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दोन्ही नेत्यांनी दोन्ही बाजूच्या टीमला सांगितलं होतं की, जास्त खेचातान करू नका. जास्त वाद न घातला जागा वाटप झालं पाहिजे. आनंदाच्या वातावरणात जागा वाटप झालं पाहिजे, असं दोघांनी सांगितलं होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Aaditya Thackeray : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? पहिला फोन कॉल कुणी केला? आदित्य ठाकरेंनी सांगितली युतीची इनसाईड स्टोरी!
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement